💥परवेज मुशर्रफ यांचा मृतदेह तीन दिवस इस्लामाबादमधल्या चौकात लटकवून ठेवा– न्यायालय



💥विशेष न्यायालयाने मुशर्रफ यांना मंगळवारी ही शिक्षा सुनावली.💥


पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना दोन दिवसांपूर्वी देशद्रोहाच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. या प्रकरणात न्यायालयाचे सविस्तर निकालपत्र समोर आले आहे. शिक्षा होण्याआधी मुशर्रफ यांचा मृत्यू झाला तर इस्लामाबादच्या डी-चौकात त्यांचा मृतदेह तीन दिवस लटकवून ठेवण्यात यावा असे निर्देश १६७ पानी निकालपत्रात देण्यात आले आहेत.“फरार असलेल्या दोषी गुन्हेगाराला पकडून आणण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी त्यांच्यापरीने सर्वोत्तम प्रयत्न करावेत व कायद्यानुसार शिक्षेची अंमलबजावणी करावी. शिक्षा होण्याआधी मृत्यू झालातर मुशर्रफ यांचा मृतदेह इस्लामाबादच्या डी चौकात आणून तीन दिवस फासावर लटकवून ठेवावा” असे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे.या खटल्यात पेशावर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश वकार अहमद सेठ यांच्या नेतृत्वाखाली त्रिसदस्यीय विशेष न्यायालयाने मुशर्रफ यांना मंगळवारी ही शिक्षा सुनावली. न्यायालयाने २ विरुद्ध १ मताने हा निकाल दिला. मुशर्रफ यांनी गुन्हा केलाय यावर न्यायाधीश सेठ आणि करीम यांचे एकमत होते तर न्यायाधीश अकबर यांचे मत विरोधात होते.निकालपत्राच्या पॅराग्राफ ६६ मध्ये मुशर्रफ यांचा मृतेदह खेचून आणावा व तीन दिवस लटकवून ठेवावा असे नमूद केले आहे. न्यायाधीश करीम पॅराग्राफ ६६ बरोबर सहमत नाहीत. परवेझ मुशर्रफ यांच्यावर सध्या दुबईमध्ये वैद्यकीयउपचार सुरु आहेत.“आपल्याविरोधातील सर्व आरोप हे राजकीय हेतूने प्रेरित आहेत. या खटल्यातील विशेष बाब म्हणजे आरोपीला आणि त्याच्या वकिलांना आपली बाजू मांडण्याचीच संधी दिली नाही.” असे मुशर्रफ यांनी त्यांच्या व्हिडीओ संदेशात म्हटले आहे.

प्रकरण काय?

परवेझ मुशर्रफ यांनी ३ नोव्हेंबर २००७ रोजी देशात आणीबाणी लागू केली होती. यादरम्यान न्यायाधीशांनाही अटक करण्यात आली. या प्रकरणात मुशर्रफ यांच्यावर देशद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला. २०१३ मध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर३१ मार्च २०१४ रोजी आरोपपत्र ठेवण्यात आले. दरम्यान, मुशर्रफ दुबईला गेले असून, तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यामुळे या शिक्षेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या