💥पुर्णा तालुक्यातील अवैध रेती उत्खनन व रेती तस्करीला लगाम लागणार तरी केव्हा ?





💥पूर्णा पोलीस प्रशासनाने पकडला चोरट्या रेतीची वाहतूक करणारा टिप्पर महसुल प्रशासनाचा कारभार संशयास्पद💥

पूर्णा/पूर्णा-गोदावरी नदी पात्रातून रेती तस्करांनी अक्षरशः नग्न तांडव चालवला असून पूर्णा-गोदावरी नदी पात्रात असंख्य ताफे तसेच टोकऱ्यांच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात रेती उपसा करीत असल्याचे निदर्शनास येत आहे या अवैधरित्या उपसा केलेल्या रेतीची तस्करी टिप्पर तसेच ट्रेक्टरच्या साहाय्याने राजरोसपणे होत असतांना संबंधित अवैध रेती उत्खनन होत असलेल्या गावातील सरपंच ग्रामसेवक तलाठी मंडल अधिकारी मात्र रेती तस्करांशी आर्थिक हितसंबंध जोपासत 'आओ चोरो बांधो भारा आधा हमारा आधा तुम्हारा' अश्या पध्दतीने कारभार चालवत असतांना मात्र तहसिलदार टेमकर व महसुल प्रशासनातील अधिकारी मात्र महिना दोन महिन्याला एखाद दुसरी किरकोळ कारवाई करुन जिल्हा प्रशासनाच्या डोळ्यात धुळ झोकत आहे.
 अवैधरित्या रेती उपसा करून वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या एका टिप्पर चालकास ताब्यात घेतले असून त्याच्यासह टिप्पर मालकाच्या विरोधात पोलीसांत विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूर्णा पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार दि.२५ रोजी रात्री ११-०० वाजण्याच्या सुमारास येथील झिरोफाटा-पुर्णा रोडवर गस्तीवर असलेल्या पोलीस निरीक्षक सुभाष राठोड,चतुराबाई गावंडे, अर्जुन रणखांब, सावंत, बोके ,विजय जाधव यांच्या पथकाने समोरून येणाऱ्या एम.एच-२९ टी १७८३ वाहनास थांबवून त्याची तपासणी केली असता त्या वाहनात २ ब्रास (बारा हजार रुपये किमतीची ) रेती आढळून आली.या प्रकरणी पोलीस नाईक विजय जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून पूर्ण पोलीस ठाण्यात टिपर चालक व मालक यांच्याविरोधात कलम ३७९,३४ भादवीसह गौण खनिज कलम कायदा मोटार वाहन अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अर्जुन रणखांब व किशोर कवठेकर हे करीत आहेत सदरील चोरटी रेतीची वाहतूक करणाऱ्या टिप्पर चालकास पोलीस प्रशासनाने ताब्यात घेतले असले तरी सदरील टिप्परच्या मालकास ताब्यात घेण्यात अद्यापही पोलीस प्रशासनाला यश आलेले नाही..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या