💥पुर्णेत १४ वर्षीय अल्पवयीन शाळकरी विद्यार्थीनीचा विनयभंग...! 💥एका आरोपी विरोधात विनयभंगासह बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल💥


पूर्णा/शहरात एका १४ वर्षिय अल्पवयीन शाळकरी विद्यार्थीनीला भर रस्त्यात अडवून तिचा विनयभंग केल्याची घटना घडली असून या घटने संदर्भात आरोपी विरोधात पुर्णा पोलिस स्थानकात आज शनिवार दि.२१ डिसेंबर रोजी विनयभंगासह,बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,येथील जुना मोंढा,गवळी गल्ली परिसरातील एका शैक्षणिक संस्थेत इयत्ता ९ वी इयत्तेत शिक्षण घेणाऱ्या एका १४ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थीनी शहरातील मस्तानपुरा भागातून दररोज शाळेत जात असते याच परिसरात राहणारा आरोपी नामें शेख सद्दाम शेख फारुख हा त्या विद्यार्थीनीस रस्त्याने शाळेत येत जात असतांना सतत छेडछाड करीत होता नेहमी प्रमाणे दि.१३ डिसेंबर रोजी सायंकाळी ०५- ३० वाजेच्या सुमारास सदरील आरोपीने त्या पीडीत मुलीस भर रस्त्यावर अडवून तीस तुम मुझे अच्छी लगती हो,मैं तुम्हे बहोत प्यार करता हूँ असे म्हणत तिचा विनयभंग केला.या घटनेमुळे घाबरलेल्या अवस्थेत त्या पिडीत मुलीने आपले घर गाठून ही घटना तीने आपल्या पालकांना सांगितली त्यावरुन आज शनिवार दि.२१ रोजी तीच्या पालकांनी शे.सद्दाम शे.फारुख याच्या विरोधात पुर्णा पोलीसांत एक तक्रार दाखल केली त्या तक्रारीवरुन कलम ३५४,(ड)(अ)(१),(१),३४१, भादवीसह कलम बाल लैंगिक अत्याचार ११,१२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पुढील तपास सपोनि प्रविण धुमाळ हे करीत आहेत..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या