💥पूर्णा-नांदेड-हिंगोली गेटजवळील ओव्हर ब्रीज कामाचे उद्या ७ डिसेंबर रोजी भूमिपूजन...!💥जिल्ह्याचे लोकप्रिय खा.संजय जाधव यांच्या शुभ हस्ते होणार ओव्हर ब्रीजच्या कामाचे भुमीपुजन💥

पूर्णा/पुर्णा-नांदेड रोडवरील हिंगोली गेटजवळील शहरातील नागरिकांच्या अडचणीचा असलेला मागील कित्येक वर्षापासुन प्रलंबित असलेल्या रेल्वे ओव्हर ब्रिजचा प्रश्न परभणी जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार मा. संजयजी जाधव यांच्या अथक परिश्रमामुळे निकाली निघाला आहे.या ओव्हर ब्रीज मुळे पूर्णा शहराच्या वैभवामध्ये भर पडणार आहे तसेच नागरिकांचा वेळ वाचणार आहे तसेच या राष्ट्रीय महामार्गावरुन नागरिकांचा प्रवास सुखकर होणार आहे.
उद्या शनिवार दि.०७ डिसेंबर २०१९ रोजी पूर्णा - नांदेड - हिंगोली गेटजवळील ओव्हर ब्रीज कामाच्या भूमिपूजनाचे आयोजन दुपारी ०१-०० वाजेच्या सुमारास करण्यात आलेले आहे... या ओव्हर ब्रीजचे भुमिपुजन परभणी जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार मा. संजयजी जाधव यांच्या शुभ हस्ते होणार आहे... याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम,पूर्णा तहसीलदार मॅडम,रेल्वे प्रशासकीय कर्मचारी,पुर्णा नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ.गंगाबाई सितारामआप्पा एकलारे यांचे सुपुत्र तथा मा.नगरसेवक संतोष एकलारे,शिवसेना उपजिल्हा प्रमुख दशरथ भोसले, युवासेना उपजिल्हा प्रमुख माणिकराव सुर्यवंशी,तालुका प्रमुख काशिनाथ काळबांडे,शहर प्रमुख संकेत उर्फ मुंजाभाऊ कदम,युवासेना शहर प्रमुख विकास वैजवाडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत यावेळी जिल्ह्यासह तालुक्यातील शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असुन या भुमिपुजनाच्या कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने नागरिक,व्यापारी,शेतकरी, कष्टकरी,युवकांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या