💥पुर्णेतील बळीराजा साखर कारखान्याने घेतला १७ वर्षीय अल्पवयीन कंत्राटी कामगाराचा बळी...!



💥बॉयलर मध्ये भुसा ढकलत असतांना चैन मध्ये पाय अडकल्याने ओंकार रेनगडे याचा दुर्दैवी मृत्यू 💥

पूर्णा/येथील बळीराजा साखर कारखान्यात कंत्राटी कामगार म्हणून कामावर असलेल्या एका अल्पवयीन १७ वर्षिय कामगाराचा बॉयलर मध्ये भुसा ढकलत असताना चैन मध्ये पाय अडकून जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज बुधवार दि.११ डिसेंबर रोजी दुपारी ०२:३५ वाजेच्या सुमारास घडली या प्रकरणी पुर्णा पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

पुर्णा येथील पुर्णा-ताडकळस मार्गावर असलेल्या बळीराजा साखर कारखान्यात प्रतिवर्षी एकतरी दुर्घटना घडत असून अत्यंत तोकड्या पगारावर कंत्राटी पध्दतीने काम करणाऱ्या कामगारांच्या जिवण सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण होत असल्याचे आजच्या घटने वरुन निदर्शनास येत असून संबंधित कंत्राटदार व कारखाना प्रशासन अल्पवयीन कामगारांना कामावर ठेवून त्यांच्या जिवीताशी खेळ करीत असल्याचे निदर्शनास येत असून या घटने संदर्भात पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार ओंकार चांदु रेणगडे (वय १७ वर्षे रा.कौडगांव ता.पुर्णा) हा जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील खाजगी कंत्राटदार शरद तुकाराम मळेकर यांच्या एजन्सी मार्फत बळीराजा कारखान्यात भुसा ढकलण्याचे कंत्राट घेतलेल्या कामावर मागील १५ दिवसांपासून काम करत होता. बुधवारी ११ रोजी सकाळी तो कामावर आला.दुपारी २:३० वाजेच्या सुमारास बाॅयलरकडे जाणा-या आर. बि.सी.चैन वर भुसा ढकलत असताना त्याचा पाय त्या चालु चैन मध्ये अडकला.पहाता पहाता तो त्या चैन मध्ये गुरफटत गेला.यातच त्याचा जागीच मृत्यू झाला.ही घटना घडल्याचे समजताच शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम, शहरप्रमुख मुंजा कदम आदी शिवसैनिकांनी घटना स्थळी भेट दिली. अशी खबर पुर्णा पोलिस ठाण्यात बळीराजा साखर कारखान्यांचे सुरक्षा अधिकारी मनोहर हरिराम केंद्रे यांनी पोलीसांना दिली.या घटनेची माहिती मिळताच सपोनि रमाकांत नागरगोजे, फौजदार चंद्रकांत पवार, जमादार सय्यद मोईन,समिर पठाण यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला.मृतदेहाचा पंचनामा करून येथिल ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.याप्रकरणी सुरक्षा अधिकारी केंद्रे यांच्या खबरीवरुन पुर्णा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास सपोनि रमाकांत नागरगोजे व जमादार सय्यद मोईन हे करीत आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या