💥मंगरूळपीर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करन्यासाठी सर्व ग्रामपंचायती सरसावल्या...!


💥ग्रामपंचायती करणार विषेश ग्रामसभेचे आयोजन,शेतकर्‍यांच्या विविध मागन्यासाठी ग्रामपंचायतीचा पुढाकार💥

मंगरूळपीर-परतीच्या पावसाने तालुक्यात धुमाकुळ घातल्याने हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेल्याने शेतकरी पुरता हैरान झाला असुन तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी शेतकरी मदतीच्या मागणीचे विषेश ग्रामसभा बोलावुन ठराव घ्यावेत आणी शासनाने मदतीसाठी शेतकर्‍यांच्या पाठीशी राहून सरसकट मदत देवून ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी सामाजीक कार्यकर्ते फुलचंद भगत यांनी केली आहे.

          पावसाने झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईसाठी शेतकर्‍यासह विविध सामाजीक संघटनांनी पुढाकार घेवुन शासनाकडे मदतीसाठी मागणी करणे गरजेचे असुन नुकसान भरपाईच्या मागणीला जोर आला असल्याने अशातच शेतकर्‍यांच्या पाठीशी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती ऊभे राहन्याचा निर्णय घेतला असुन ठोस मदतीच्या मागणीसाठी काही ग्रामपंचायतींनी ठरावही घेतले आहेत. आपल्या गावात ग्रामसभा बोलावून त्या सेभेत  ठराव घेवुन शासनाने
ओला दुष्काळ जाहीर करावा, सातबारा कोरा करावा, कुठलीही अट न घालता व पंचनामा न करता सर्व शेतकऱ्यांना १००% विमा लाभ देन्यात यावा, तसेच शासना तर्फे कुठलेही निकस न लावता सर्व शेतकर्‍यांना तसेच ज्या शेतकऱ्यांनी विमा फाडला नाही त्यांनाही हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाही आदी मागन्या चे विषेश ग्रामसभा बोलावुन ठराव घावेत व शासनाकडे मागणी करावी आणी संघटीतपणे सर्वांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे असे आवाहनही सामाजीक कार्यकर्ते फुलचंद भगत यांनी ग्रामपंचायतींना केले आहे.तालुक्यातील
सर्व ग्रामपंचायतींनी ठराव घेवून एकत्र शासनाकडे सादर करुन याकरिता राज्यभर आंदोलन उभे करन्याची गरज असल्याचेही  फुलचंद भगत यांनी मत व्यक्त केले आहे. संपूर्ण वाशिम जिल्ह्यात परतीच्या पावसाने थैमान घातल्याने उडिद मूग यासह  सोयाबीन व कपाशी या पिकाचे  ऐन काढणीच्या  च्या हंगामात फार मोठे नुकसान झाले आहे परिणामी शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे शेतकऱ्यांना दिलासा मिळावा याकरीता मंगरुळपीर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी जोर धरत आहे. तालुक्यात गेल्या महिनाभरा पासुन  पावसाने  हजेरी लावल्याने  मूग उळीद सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरीवर्ग आर्थिक टचाईत  सापडला आहे पावसामुळे घराचे ही नुकसान झाले आहे त्यामुळे शेताचे व घराचे पंचनामे करून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी व तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा शेतात असलेले पिक पावसामुळे खराब तर झालेच पण काहींनी सोयाबिन काढुन घरी आनलेले असल्याने ते सुध्दा खराब झालेले आहे त्यामुळे त्याचाही पंचनामा करुन शासनाने मदत द्यावी अशी मागणी सामाजीक कार्यकर्ते फुलचंद भगत यांनी केली आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या