💥पुर्णा शहरातील सिध्दार्थ नगर परिसरात युवकांमध्ये शसस्त्र हाणामारी...!💥पोटात चाकु लागल्यामुळे दोन युवक गंभीर जख्मी💥

पूर्णा/शहरातील सिध्दार्थ नगर परिसरात काल मंगळवार दि.२६ नोव्हेंबर २०१९ रोजी दुपारी १२-०० वाजेच्या सुमारास युवकांच्या गटात झालेल्या वादानंतर शसस्त्र हाणामारी झाली असून सदरील घटनेत झालेल्या चाकूहल्ला प्रकरणी आज बुधवार दि.२७ नोव्हेंबर रोजी दोन्ही कडील फिर्यांदीनी दिलेल्या फिर्यादी वरून परस्पर एकमेकांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले.
         पूर्णा पोलीस प्रशासनाने दिलेल्या अधिक माहिती वरून सिद्धार्थ नगर येथील प्रीतम भदरगे हा युवक दुपारी १२-०० वाजता आपल्या घराच्या मागील बाजूस बसला असता किरण बुरड व सुरेश बुरड या दोघांनी त्यास जीवे मारण्याच्या उद्देशांने चाकूने पोटात वार केले या घटनेत तो गंभीर जखमी असून आई पंचशीला निवृत्ती भदरगे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून वरील दोघा विरुद्ध पूर्णा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    तर याच घटने प्रकरणी किरण बुरड यांनीं दिलेल्या तक्रारी वरून सोमवार दि.२६ नोव्हेंबर २०१९ रोजी दुपारी प्रीतम भदरगे याने त्याच्या उजव्या हातातील चाकूने सुरेश बुरड याच्या पोटावर व उजव्या मांडीवर वार केला तसेच युवराज नाटकर याने प्रीतम याचा हातातून पडलेला चाकू घेऊन किरण बुरड याच्या वर वार केला  हा वार चुकवत असताना चाकू हा प्रीतम भदरगे याच्या पोटात लागला व तो गंभीर  जखमी झाला या प्रकरणी दिलेल्या फिर्यादी वरून वरील दोघा विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून तपास सपोनि प्रवीण धुमाळ हे करीत आहेत...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या