💥पुर्णेत शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या ७ व्या स्मृती दिन कार्यक्रमाचे आयोजन..!💥शिवसेना शहर प्रमुख संकेत उर्फ मुंजाभाऊ कदम यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शिवसैनिकांनी दिली श्रध्दांजली💥

पुर्णा/शिवसेना संस्थापक तथा शिवसेना प्रमुख तथा जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार हिंदुहृदय सम्राट स्व.बाळासाहे ठाकरे यांचा आज ७ वा स्मृती दिन असून या स्मृती दिना निमित्त शहरातील झिरोफाटा टि पॉईंट परिसरातील शिवसेना कार्यालयात आज रविवार दि.१७ नोव्हेंबर रोजी शिवसेना शहर प्रमुख संकेत उर्फ मुंजाभाऊ कदम यांच्या नेतृत्वाखाली श्रध्दांजलीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते

यावेळी शेकडो शिवसैनिकांनी एकत्रित होऊन हिंदुहृदय सम्राट स्व.शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करुन श्रध्दांजली अर्पण केली.यावेळी युवा सेना उपजिल्हा प्रमुख माणिकराव सुर्यवंशी,शिवसेना तालुका प्रमुख काशिनाथ काळबांडे,शिवसेना नगरसेवक ॲड्.राज भालेराव,नगरसेवक शामराव कदम,मा.नगरसेवक साहेब कदम,युवासेना शहर प्रमुख विकास वैजवाडे,उपशहर प्रमुख कालिदास वैद्य,श्रीनिवास तेजबंद,गणेश कदम,गोपाळ कदम,सुनील कदम,गोविंद कदम आदींसह असंख्य शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या