💥एसटीतील विनातिकीट प्रवाशांच्या दंडावर आता ‘जीएसटी’ ?



💥याबाबतचे आदेश एसटीच्या सर्व विभागीय कार्यालयांत पोहोचले आहेत💥

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने बसमध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर आता १८ टक्के वस्तू व सेवा कराचा (जीएसटी) बोजा टाकला आहे. त्यामुळे नियम मोडणाऱ्यांना आता दंडापोटी जास्त रक्कम मोजावी लागणार आहे. याबाबतचे आदेश एसटीच्या सर्व विभागीय कार्यालयांत पोहोचले आहेत. एसटीतील काही कर्मचारी  नियमानुसार तिकीट न देता कमी रक्कम घेऊन प्रवास करण्याची मुभा देतात. त्यातून एसटीला मोठा आर्थिक फटका बसतो. तो टाळण्यासाठी विविध भागांत एसटी  बसमध्ये तिकीट तपासणी मोहीम राबवली जाते. या मोहिमेत विनातिकीट आढळणाऱ्या प्रवाशांकडून किमान १०० तर जास्त तिकीट दर असलेल्यांकडून तिकिटाच्या दुप्पट रक्कम दंड म्हणून आकारली जाते. पूर्वी या रकमेवर जीएसटी कराची आकारणी होत नव्हती. परंतु एसटी महामंडळाकडून आता या दंडाच्या रकमेवर तब्बल १८ टक्के जीएसटी आकारण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे प्रत्येक विनातिकीट प्रवाशाला आता दंडापोटी १०० रुपयांचे तिकीट असलेला मार्ग असल्यास करापोटी २० रुपये द्यावे लागतील. शंभराहून जास्त दराच्या तिकिटाचा मार्ग असल्यास त्याहून दुप्पट दंड द्यावा लागेल...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या