💥परभणी जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे उध्वस्त झालेल्या पिकांचे दि.०२ नोव्हेंबर रोजी गावागावांत पंचनामे..!💥शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह फोटोही तयार ठेवावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे💥

परभणी/जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन,कापूस,हळद,ज्वारी आदीसह फळ-भाज्या आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या तोंडचा घास निसर्गाने पळवला असल्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे.जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उध्वस्त झालेल्या पिकांचे उद्या शनिवार दि.०२ नोव्हेंबर  पासून जिल्ह्यातील गावागावात सोयाबीन कापूस आदी उध्वस्त  पिकांचे पंचनामे करण्यात येणार आहेत शेतकऱ्यांनी आपआपल्या गावात थांबून उध्वस्त पिकांचे फोटो व आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावी असे आवाहन करण्यात आले आहे.

परतीच्या पावसाच्या तडाख्यात प्रत्येक गावातील शेतकऱ्यांची पिके उध्वस्त झाली होती या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने पंचनामे करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी पी शिवशंकर यांनी दिली

परभणी जिल्ह्यातील ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या ठिकाणी पंचनामे लगेच उद्यापासून सुरू करण्यात येणार आहेत ग्रामसेवक तलाठी आणि कृषी सहाय्यक गावागावांमध्ये जाऊन पंचनामे करतील तसा अहवाल जिल्हा  प्रशासन ला सादर करतील शेतकऱ्यांनी आतापर्यंत जे अर्ज दिले आहे त्यांचे पंचनामे  केले जातील एवढेच नव्हे तर प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी अर्ज द्यावेत त्यांचीही पंचनामे करण्यात येतील असेही जिल्हाधिकारी म्हणाले

परभणी जिल्ह्यातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे


यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कलेक्टरांशी संपर्क साधला त्यांनी यासंदर्भात पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत ..... परभणी पिंगळी झरी पाथरी बाबळगाव हदगाव सोनपेठ या भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती त्यांनी दिली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या