💥पुर्णा तालुक्यात गोदावरी-पुर्णा नदीपात्रावर वाळू माफीयांचे अधिराज्य....!💥महसुल प्रशासनातील भ्रष्ट अधिकारी,सरपंच,ग्रामसेवक,तलाठी,मंडळ अधिकारी,वाळू माफीयांचे संगणमत💥

परभणी/जिल्ह्यातील पुर्णा-पालम-गंगाखेड तालुक्यातून वाहणाऱ्या पुर्णा-गोदावरी नदी पात्रावर महसुल प्रशासनातील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या कृपा आशिर्वादाने असंख्य वाळू माफियांच्या गतीशिल टोळ्यांनी अक्षरशः अधिराज्य निर्माण केले असून पुर्णा-गोदावरी नदी पात्रात पाणीसाठा असतांनाही वाळू माफीयांच्या टोळक्यांनी नदी पात्रात असंख्य ताफे सोडून बेकायदेशीर पध्दतीने अवैध वाळू उपसा सुरु केल्याचे निदर्शनास येत असून यात पुर्णा तालुका आघाडीवर असून या वाळू माफीयांच्या टोळक्यांमध्ये गुन्हेगारी प्रवृतींचा शिरकाव झाल्याने परिसरात अनेक वेळा या टोळ्यांमध्ये घटके उडतांना पाहावयास मिळत असून आसपासच्या शेतकऱ्यांना धमकावण्याचे प्रकारही समोर येत आहे.

जिल्ह्याचे कर्तव्य कठोर जिल्हाधिकारी श्री.पि.शिवशंकर यांनी तात्काळ या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वाळू तस्करी विरोधात कठोर पावले उचलून वाळू तस्करी ज्या गावातील नदी पात्रातून होत आहे त्या गावातील सरपंच-उपसरपंच-ग्रामसेवक-तलाठी-मंडळ अधिकारी यांना जवाबदार धरुन त्यांच्या विरोधात अवैध वाळू उपसा व वाळू तस्करीस प्रोत्साहन दिल्या प्रकरणी कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.मागील  दोन दिवसापुर्वी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पि.शिवशंकर यांनी धाडसी कारवाई करीत बुधवार दि.२७ नोव्हेंबर रोजी दुपारी ०२-०० ते ०२-३० वाजेच्या सुमारास पुर्णा तालुक्यातील मौ.कानेगाव येथे वाळू माफीया पुर्णा नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करण्यासाठी वापरत असलेले एकून १८ ताफे जप्त करुन ते जाळून नष्ट करण्याची कारवाई केली असली तरी या अवैध वाळू उत्खनन वाळू तस्करीस प्रोत्साहन दिल्या प्रकरणी मात्र जिल्हाधिकारी पि.शिवशंकर यांनी संबंधित गावचे सरपंच-उपसरपंच-ग्रामसेवक-तलाठी-मंडळ अधिकारी यांच्यावर कुठल्याही प्रकारची कायदेशीर कारवाई केली नसल्यामुळे तालुक्यात अद्यापही राजरोसपणे शेती उपयोगी वाहण असलेल्या ट्रेक्टर टिप्पर तसेच गाढवांच्या साहाय्याने खुलेआम वाळू तस्करी होतांना निदर्शनास येत आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या