💥पुर्णा तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते तथा मा.सभापती व्यंकटराव देसाई यांना पितृशोक..! 💥पुर्णा सहकारी साखर कारखान्याचे मा.उपाध्यक्ष दत्तराव खिराजी देसाई यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी वृध्दापकाळाने निधन💥

पुर्णा/ तालुक्यातील चुडावा येथील जेष्ठ नागरिक तथा पुर्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष दत्तराव खिराजी देसाई यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले ते पंचायत समिती सभापती सौ.चंद्रकलाबाई व्यंकटराव देसाई यांचे सासरे व सामाजिक कार्यकर्ते तथा नेते व्यंकटराव देसाई यांचे वडील व जगदीश व्यंकटराव देसाई व संदेश देसाई यांचे ते आजोबा होत त्यांच्या पश्चात दोन मुले तीन मुली नातू नातवंडे असा मोठा परिवार आहे त्यांचा अंत्यविधी उद्या रविवार दि.२४ नोव्हेंबर २०१९ रोजी वार सकाळी ११-०० वाजता त्यांच्या कावलगाव रोड वरील शेतात त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत सतत राजकीय क्षेत्रात कार्यरत असल्या कारणामुळे त्यांच्या कुटुंबियांचा मोलाचा वाटा राहिला असल्यामुळे पंचक्रोशीतील तसेच तालुका भरातून त्यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या