💥देशभर कांद्याची प्रचंड टंचाई ? महिना अखेरपर्यंत हजार टन कांदा आयात होणार....!



💥राजधानी दिल्लीत कांद्याचे भाव १०० रुपये प्रतिकिलो💥 

देशभर कांद्याची प्रचंड टंचाई असून, त्याचे भाव प्रतिकिलो ८० रुपयांवर गेले आहेत. त्यामुळे खासगी व्यापाऱ्यांनी विदेशातून कांदा आयात करण्यासाठी ऑडर्स दिल्या असून, चालू महिन्याच्या अखेरपर्यंत किमान १ हजार टन कांद्याची आयात होऊ शकेल, असे एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले. गेल्या आठवड्यात राजधानी दिल्लीतकांदा१०० रुपये किलो झाला होता. सरकारने विविध पातळ्यांवर हस्तक्षेप केल्यामुळे किमती काही प्रमाणात कमी झाल्या. तरीही सध्या कांद्याचे दर ६० ते ८० रुपये किलोच्या दरम्यान असून, विदेशी कांदा आल्यानंतरच ते खाली येऊ शकतील, असेसूत्रांनी सांगितले. वाणिज्य मंत्रालयाच्या एका अधिकार्यांने सांगितले की, खासगी व्यापाऱ्यांनी अल्प प्रमाणात कांदा आयात केल्याचे सरकारला कळविले आहे. याशिवाय महिनाअखेरपर्यंत १ हजार टन कांद्याची आयात होणार आहे. पुढील महिन्यात आणखी १ हजार टन कांदा आयात होईल.अधिकार्यांने सांगितले की, डिसेंबर अखेरपर्यंत आयातीसाठी आवश्यक असलेले निकष शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे कांदा आयात सुलभेतेने होईल. देशांतर्गत बाजारात कांद्याची उपलब्धता व्हावी आणि किमती नियंत्रणात राहाव्यात, यासाठी सरकारने खासगी व्यापारी आणि सरकारी संस्था यांच्या माध्यमातून कांदा आयातीस परवानगी दिली आहे. सरकारी मालकीच्या एमएमटीसीमार्फत १ लाख टन कांदा आयात करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. एमएमटीसीने ४ हजार टन कांदा आयातीसाठी निविदाही मागविल्या आहेत...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या