💥सिमेवर सैन्याला पाचारण,सिमेवर लोखंडी कुंपण उभारण्यात येत असून त्यातून वीज प्रवाह सोडण्यात येणार💥
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पयांनी घुसखोरांना रोखण्यासाठी नवनवीन प्रयोग सुरू केले आहेत. मेक्सिकोतून अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर घुसखोरी होत आहे. यामुळे गेल्या दोन वर्षांपासून ट्रम्प यांनी सीमेवर सैन्य पाचारण केले आहे. तर लोखंडी कुंपण उभारण्यात येत असून त्यातून वीज प्रवाह सोडण्यात येणार आहे. ज्या देशांच्या सीमा जोडलेल्या आहेत त्या सर्वच देशांना घुसखोरीचा प्रश्न भेडसावत आहे.अमेरिकाही त्यातून सुटलेली नाही. खंडातील अन्य देशांमधून अमेरिकेमध्ये घुसखोरी होते. हा लोंढा रोखण्यासाठी ट्रम्प प्रशासन जोरदार प्रयत्न करत आहे. लोखंडी भिंतीच्यावर काटेरी तारा लावल्या जात आहेत. वीज प्रवाह पार करून जर कोणी ही भिंत पार करण्याचा प्रयत्न केल्यास या तारांमध्ये अडकून त्याचा मृत्यू होईल. याच बरोबर जुन्या काळातील राजांची सीमा सुरक्षेची क्लुप्तीही ट्रम्प प्रशासन वापरणार आहे. या लोखंडी भिंतीसोबतच मोठा चर खोदून त्यामध्ये पाणी भरण्यात येणार आहे. यामध्ये साप आणि मगरीसारखे खतरनाक प्राणी सोडण्यात येणार आहेत. मार्चमध्ये ट्रम्प यांनी सल्लागारांच्या बैठकीत हे मुद्दे मांडले होते.मेक्सिकोच्या सीमेवर कुंपण घालण्याचे काम जोरात सुरू आहे. 22 किमीची भिंत तयार झाली असून एकूण 3600 किमीची सीमा आहे. ट्रम्प यांनी सांगितले की, ही एक अशी भिंत आहे की ती उष्णता लगेचच खेचून घेते. या भिंतीवर अंड्याचे पोळाहीबनवता येईल. भिंतीच्या खालीही खोलवर काँक्रीट घालण्यात आले आहे, यामुळे कोणी सुरुंगही खोदू शकणार नाही. या भिंतीसाठी 8 ते 67 अब्ज डॉलर्सचा खर्च अपेक्षित आहे...
0 टिप्पण्या