💥पुर्णा अवैध गुटखा प्रकरणातील आरोपी संदिप लकडेला उच्च न्यायालय औरंगाबाद खंठपीठाचा दणका...!💥आरोपी विरोधात दाखल प्रथम खबर रिपोर्ट (FIR) रद्द करण्यासाठी दाखल याचीका उच्च न्यायालयाने फेटाळली💥

पुर्णा/पुर्णा पोलीस प्रशासनाने गुटखा तस्करांविरोधात केलेल्या कठोर कारवाईच्या चक्रव्यूहात गुटखा तस्कर चांगलेच जखडले गेले असून पोलिस स्थानकाचे पो.नि.सुभाषराव राठौड यांच्या मार्गदर्शनाखाली कर्तव्यकठोर पो.उप.नि.चंद्रकांत पवार यांनी दि.११ जुन २०१९ रोजी लाखों रुपयांच्या गुटखा जप्ती प्रकरणात अत्यंत काटेकोरपणे व सखोल चौकशी करुन अवैध गुटखा विक्रीची पालेमुळे खनून काढली होती

या संदर्भात पुर्णा पोलिस स्थानकात गुरनं १८१/१९ कलम ३२८,२७२,२७३,१८८,१२०(ब) अन्न भेसळ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता या अवैध गुटखा तस्करी प्रकरणातील आरोपी संदिप कैलासआप्पा लाकडे हा मागील चार महिण्यापासून या भयंकर चक्रव्यूहातून स्वतःचा बचाव करण्यासाठी पोलीस प्रशासनाला हुलकावणी देत आहे.आरोपी संदिप याने त्याच्यावर पुर्णा पोलीस स्थानकात दाखल गुरनं.१८१/२०१९ व घनसावंगी पोलीस स्थानकात दाखल १६१/२०१९ या गुन्ह्यातील प्रथम खबर रिपोर्ट (FIR) रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली होती

 परंतु पुर्णा पोलीस स्थानकातील तपासणीस अधिकारी पो.उप.नि.चंद्रकांत पवार यांनी केलेल्या तपासावर समाधान व्यक्त करत सन्माननीय उच्च न्यायालयाने आरोपी गुटखा तस्कर संदिप लाकडे यांची याचीका फेटाळून लावली असून त्याचा जामीनही रद्द करण्यात आला आहे या याचीकेवर सुनावनी करतांना सन्माननीय न्यायालयाने असे नमूद केले आहे की आरोपी विरुध्द मागील बऱ्याच दिवसापासून वेगवेगळ्या गुटखा संबंधिच्या गुन्ह्यांची नोंद आहे सदर दोन्ही गुन्ह्यात आरोपी कडून जवळपास ११ लक्ष रुपयांचा अवैध गुटखा पकडण्यात आला आहे.आरोपी हा कायद्याची पायमल्ली करणारा आहे म्हणून त्याची याचीका म्हणजे अर्ज नामंजूर करण्यात येतो सन्माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णय अत्यंत समाधानकारक अवैध गुटखा तस्करांना फार मोठी चपराक असून या निर्णयाचे सर्वच स्तरातून स्वागत होत असून पुर्णा पोलीस स्थानकाचे कर्तव्यदक्ष पो.नि.सुभाषराव राठौड व सहा.पो.उप.नि.चंद्रकांत राठौड यांच्या अत्यंत उल्लेखनीय कामगीरीचे कौतुक केले जात आहे..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या