💥पुर्णा-झिरोफाटा मार्गावर पकडण्यात आलेल्या अवैध विदेशी दारु साठ्याचा मुळ मालक कोण...?


💥जप्तीतील मुद्देमालाचा बॕच क्रमांक तपासून संबंधित परवाना धारक दारु दुकानदारावर गुन्हें दाखल होतील काय ?💥 

पुर्णा/संपूर्ण तालुक्यात दुचाकी-चारचाकी वाहणाद्वारे अवैध देशी-विदेशी दारुची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असून या अवैध देशी-विदेशी दारु तस्करी करणाऱ्यासह अवैध देशी-विदेशी दारु विक्रेत्यांना बेकादेशीर रित्या मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी दारुचा पुरवठा करणारा परवाना धारक देशी-विदेशी दारु विक्रेता कोण ? असा प्रश्न वेळोवेळी उपस्थित होत असतांनाच आज गुरुवार दि.०३ आक्टोंबर रोजी दुपारच्या सुमारास पोलीस स्थानकात हजर असलेल्या पोना.विजय जाधव,पोहेकॉ.मोईन,पोहेकॉ अर्जुन रणखांब,पोकॉ.समीर पठान यांना  गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली कि पुर्णा-झिरोफाटा मार्गावर एक इसम पांढरी पिशवी घेऊन त्यात विदेशी दारुची अवैध विक्री करण्यासाठी एका बिना नंबरच्या मोटार सायकलवर घेऊन जात आहे घटनेची माहिती मिळताच संबंधित पथकाने पो.नि.सुभाषराव राठौड यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करीत ०२-३० वाजेच्या सुमारास  साहेबराव सावंत व किशोर बुरड या दोन आरोपींकडून बिना नंबरची प्लाटीना मोटर सायकल किंमत १५ हजार रुपयें व ४९५५ रुपये किंमतीचा विदेशी दारु साठा यात ब्लँडर प्राईडच्या सिलबंद १८० एमएल.च्या २ क्वॉटर (बॕच क्रमांक २०२७) किंमत ७२० रुपयें,ट्युबर्ग बिअर ६ बॉटल (बॕच क्रमांक ०२४) किंमत प्रति बॉटल १६५ प्रमाणे एकून ९९० रुपयें,ओल्डमंक थ्रि एक्स रम १८० एमएल १२ बॉटल प्रति बॉटल १३० रुपयें तर ९० एमएल ६ बॉटल प्रत्येकी किंमत ७० रुपये (बॕच क्रमांक ५२) असा एकून किंमत १९९० रुपयें,इंम्पेरिअल ब्ल्यु (बॕच क्रमांक ००७१) ९० एमएल १३ बॉटल प्रति बॉटल ७० रुपयें एकून ९७५ रुपये,ब्लॅक १८० एमएल (बॕच क्रमांक ५२९) प्रति बॉटल १४० रुपयें एकून २८० रुपयें असा एकंदर ४९५५ रुपयांच्या दारु साठ्यासह १९९५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदरील अवैध विदेशी दारु साठा शहरातील कोणत्या परवाना धारक किरकोळ देशी-विदेशी दारु दुकानदाराचा आहे याचा बॕच क्रमांकाप्रमाणे शोध लावून संबंधित परवाना धारक दारु विक्रेत्यावरही पोलीस प्रशासन कारवाई करुन गुन्हें दाखल करणार की नेहमी प्रमाणे अर्धवट तपास करुन अवैध दारु विक्रीला प्रोत्साहन देणाऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न केला जाईल याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष केंद्रित झाले आहे..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या