💥लोकशाहीला बळकट करण्यासाठी मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन...!💥रॅलीमध्ये उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडनीस, तहसिलदार रूपेश खंडारे यांची प्रमुख उपस्थिती💥 

💥प्रतिनिधी - सविता चंद्रे

उमरखेड, दि . ११ : -लोकशाहीला बळकट करण्यासाठी व तरुण मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करणे यासाठी तालुका प्रशासन व सर्व सामाजिक संघटनाच्या वतिने आज दि ११ ऑक्टोबर रोजी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते . हि रॅली जि.प. माध्यमीक शाळा येथुन माहेश्वरी चौक, गांधी चौक, खडक पुरा , आठवडी बाजार , नाग चौक, बस स्टॅंड मार्गे नगर परिषद येथे रॅलीचा समारोप करण्यात आला.या रॅलीमध्ये उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडनीस, तहसिलदार रूपेश खंडारे, गटविकास अधिकारी जयश्री वाघमारे, न.प. मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले, गटशिक्षण अधिकारी सचिन खुडे, सर्व सामाजिक संघटनांचे सदस्य, व शाळेतील विदयार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते . या रॅलीला उमरखेड वाशीयांनी  उस्पुर्त प्रतिसाद दिला...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या