💥नंदूरबारमध्ये काँग्रेसला धक्का,काँग्रेसचे पक्षाचे जिल्हाध्यक्ष रघुवंशी शिवबंधनात...!💥मातोश्री’ निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हातून शिवबंधून बांधून भगवा खांद्यावर घेतला💥

विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. निवडणूक तोंडावर आली असताना नंदूरबारमध्ये काँग्रेसला तगडा धक्का बसला आहे. काँग्रेसचे नंदूरबार जिल्ह्याचे अध्यक्ष चंद्रकांत रघुवंशी यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. बुधवारी ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हातून शिवबंधून बांधून भगवा खांद्यावर घेतला. रघूवंशी यांच्यासह त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला.
चंद्रकांत रघुवंशी यांचे उद्धव ठाकरे यांनी पक्षामध्ये स्वागत केले. रघुवंशी यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना नंदूरबार जिल्ह्यात प्रचारासाठी येणार असे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच नंदूरबारमध्ये भगवा फडकणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या