💥उमेदवारांमध्ये धाकधूक तर जनतेत निकालाची उत्सुकता...!



💥आमदारकीची माळ कोणाच्या गळ्यात पडते ? याबाबत जनतेमध्ये कमालीची उत्सुकता💥

*गणेश सानप*

रिसोड - विधानसभा 2019 च्या सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेंतर्गत रिसोड मालेगाव विधानसभा मतदारसंघात 21 आँक्टोबर रोजी मतदान पार पडले. बरोबर तीन दिवसांनी म्हणजे 24 आँक्टोबर रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार असल्याने सर्वच उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. आपण किती पाण्यात आहोत हे उमेदवारांना आज कळणार आहे तर आमदारकीची माळ कोणाच्या गळ्यात पडते ? याबाबत जनतेमध्ये कमालीची उत्सुकता दिसून येत आहे. 24 तारखेला दुपारपर्यत याचा सोक्षमोक्ष लागणार असून रिसोड मालेगाव तालुक्याच्या कानाकोपर्‍यात निकालाबाबत खुमासदार चर्चा होत आहे. तालुक्यात पंचरंगी लढत झाल्याने जिल्ह्यातील प्रमुख निकालांमध्ये या विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे.
    रिसोड मालेगाव ’सेन्सिटिव्ह झोन’ म्हणून ओळखला जातो.. परंतु यंदाचा निकाल काय लागेल यादृष्टीने लागणार्‍या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. 2014 प्रमाणे यंदाही देशभरात मोदीलाट असेलही पण त्यातच यावेळी शिवसेना, भाजप, आरपीआय (आ), रासप, शिवसंग्राम महायुती झाल्याचा फायदा महायुतीचे उमेदवारास होते का?  हे पाहणे रंजक ठरणार आहे. काही कार्यकर्यांनी आपला विजय निश्चित असल्याचे आधीच घोषित करून टाकले आहे. शहरात तयार झालेले पोस्टर्स पण झाकून ठेवलेले याचे उदाहरण आहे.
    एकंदरीत यंदाची निवडणूक अटीतटीची होणार व ती ऐतिहासीक ठरणार असल्याचे मत राजकीय तज्ञ व्यक्त करीत आहे. 2014 चे लोकसभा ’इलेक्शन’ विकासाच्या मुद्यावर लढले गेले. तरीही गेल्या पाच वर्षात भूमिगत झालेला ’विकास’ अद्याप कोणाच्याही हाती लागला नाही. पाच वर्षांनी यंदा पुन्हा लोकशाहीचा उत्सव पार पडला. 2014 च्या निवडणुकीत विकासाचा मुद्दा घेतला होता. तरीही पाच वर्षात विकासाचे दर्शन न झाल्याने यंदा हा मुद्दा बाजूला सारून थेट विविध मुद्यावर निवडणूक झाली. उमेदवार मात्र जातीय विभागणीवर मतांची आस लावून बसले आहेत. परवा लागणार्‍या विधानसभा निवडणुक निकालातून उमेदवाराचा विजय जातीय ध्रुवीकरणातुन होते की विकासाच्या मुद्यावर होते हे लवकरच कळणार आह
कट-टू-कट लागेल निकाल
    सध्याच्या चित्रावरून तरी विद्यमान प्रमुख उमेदवारांपैकी कोणी भरघोस मतांनी निवडून न येता ’कट-टू-कट’ मतांनी विजयी उमेदवार विजयश्री खेचून आणेल असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. 2014 च्या तुलनेत विकासाचा मुद्दा बाजूला सारून यंदा 2019 निवडणुकीत जातीय मतांची विभागणी व जुळवाजुळव याकडे उमेदवारांनी भर दिल्याने निवडणुकीतुन विकासाच्या मुद्याकडे आपोआपच दुर्लक्ष झाले आहे. शहराची व ग्रामीण भागातील राजकीय व सामाजिक परिस्थिती पाहता कोणाला आपले मत ’दान’ करायचे हे ओळखून सुज्ञ नागरिकाने मतदान केले आहे. सर्वच पक्षांच्या एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोपांच्या भाषणांतून डोक्याचा भुगा झालेल्या सुजाण नागरिकाने मतदान यंत्रावरील बटन दाबताना ’सिक्स्थ सेन्स’ वापरून मत टाकले आहे. मतदानांच्या ती नदिवसाच्या विश्रांतीनंतर आज मतमोजणी प्रक्रिया पार पडत असून, निकालाअंती उमेदवार कोणीही विजयी होऊ देत, यंदा तरी रिसोड मालेगाव तालुक्याचा विकास झाला म्हणजे मिळवलं, अशी भावना ग्रामीण भागातील जनतेची आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या