💥पुर्णेत विजया दशमी दिनी ग्रामीण भागात विक्रीसाठी जाणारी अवैध देशी दारु जप्त....!



💥डिवायएसपी श्रीकृष्ण कर्डीले यांची आपल्या एक वर्षाच्या कालावधीतील पहिलीच मोठी कामगीरी💥

पुर्णा/तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध देशी-विदेशी दारु विक्रीसह ग्रामीण भागात अवैध देशी-विदेशी दारुची दुचाकी-चारचाकी वाहणांतून तस्करी होत असतांना वर्ष-सहा महिण्याला एखाद कारवाई करुन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या डोळ्यात धुळ झोकण्याचा प्रकार जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांकडून तसेच पोलीस प्रशासनाकडूनही होतांना पाहावयास मिळत आहे.
पुर्णा-झिरोफाटा मार्गावर दि.०३ आक्टोंबर २०१९ रोजी दुपारच्या सुमारास किंगबार लगत ४९५५ रुपयांचा अवैध विदेशी दारु साठा पकडल्याच्या घटनेला अवघे चार दिवसही होत नाही तोच पुर्णा-हयातनगर रस्त्यावरील सुहागन गावाजवळ दि.०७ आक्टोंबर २०१९ रोजी दुपारी ०२-०० वाजेच्या सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकृष्ण कर्डीले यांची कर्डी नजर नव्हें तर त्यांना गुप्त बातमीदारा कडून मिळालेल्या माहिती वरुन त्यांच्या नेतृत्वाखाली जमादार सिद्धीकी महाजन,पठाण आदींनी पॕशन प्रो या जुन्या दुचाकी गाडीवरुन दोन बॉक्स ज्यात ९६ देशी दारुच्या बाटल्या किंमत अंदाजे ४५०० रुपयें किंमतीचा मुद्देमाल घेऊन जात असतांना वसमत शहरातील बुधवार पेठेतील रहीवाशी असलेले आरोपी सारंग उत्तम हमाने,अशोक दिगंबर आलगुडे,अशोक अवधूत या तिन आरोपींना ताब्यात घेतल्याची कारवाई केली या प्रकरणी पोकॉ.नवनाथ महाजन यांच्या फिर्यादी वरुन नमुद तिनही आरोपीं विरोधात कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेतील आरोपींकडून जप्त करण्यात आलेला अवैध देशी दारुचा साठा जप्त देशी दारु साठ्याचा बॕच क्रमांक तपासून शहरातील नेमक्या कोणत्या परवाना धारक देशी दारु विक्रेत्याकडील आहे.याचा तपास होणे अत्यंत आवश्यक असून सदरील अवैध देशी दारुचा साठा विजया दशमी अर्थात दसऱ्याच्या दिवशी म्हणजेच ड्रायडेच्या दिवशी ग्रामीन भागात विक्रीसाठीच जात असल्याचे दिसते.उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकृष्ण कर्डीले यांची त्याच्या एक ते सव्वा वर्षाच्या काळातील अवैध देशी दारु विक्री विरोधातील ही पहिलीच मोठी कारवाई असल्यामुळे त्यांचेही अभिनंदन व्हायलाच हवे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या