💥पुर्णेतील आनंदनगर परिसरात पोलीस असल्याचे सांगून सेवानिवृत्त प्राध्यापकास चोरट्यांनी लुटले...!



💥भर दुपारी घडली घटना ३५ हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी पळवली💥

पूर्णा/शहरात सर्वत्र सिसीटिव्ही कॕमेरे असतांनाही चोरट्यांचा मुक्त संचार होतोच कसा ? असा प्रश्न उपस्थित होणारी घटना घडली असून एका ७९ वर्षीय सेवानिवृत्त प्राध्यापकास स्कुटीवरुन आलेल्या दोघा भामट्यांनी भर दुपारी दिवसाढवळ्या रस्त्यात अडवून पोलीस असल्याची बतावणी करून  त्याच्या जवळील ३५ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना घडली आहे.त्यामुळे शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
          शहरातील आनंदनगर मध्ये राहणारे प्रभाकर पांडुरंग डुब्बेवार  वय ७९ वर्षे असे त्या पीडित  सेवानिवृत्त प्राध्यापकाचे नांव आहे.ते मंगळवारी २९ आक्टोंबर २०१९ रोजी दुपारी १२-३० वाजण्याच्या सुमारास येथील महाराष्ट्र बँकेच्या शाखेत पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यांनी ४५ हजार रुपयांची रोकड बँकेतून काढली. व ते तूथून पीशवीत रोकड ठेवून बाजारात गेले.दुपारी ०४-०० वाजता बाजारातील काम आटोपून ते आपल्या घराकडे परतत असताना शहरातील आनंद नगर भागातील काबरा यांच्या घराजलळून जात असताना मागून स्कुटीवरुन आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांना रस्त्यात अडवले. पोलिस असल्याचे सांगून त्यांची पीशवी तपासली व हातचालाखी करीत पीशवीतील ३५ हजार रुपयांची रोकड त्यांनी पळवून नेली. दुपारची वेळ असल्याने आरडाओरड करुनही कोणी मदतीला धावून न आल्याने त्यांनी घर गाठले व घरच्या मंडळींना घडलेला प्रकार सांगितला.नंतर त्यांनी पुर्णा पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकरणी रितसर तक्रार दाखल केली या तक्रारीवरुन  दोन अज्ञात चोरट्यां विरोधात पुर्णा पोलिस ठाण्यात ४१९,३४ कलमां नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पो.उप.निरीक्षक चंद्रकांत पवार हे करीत आहेत..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या