💥गंगाखेड विधानसभा मतदार संघात प्रथमच तुरुंगातून निवडणूक लढवण्याचा मान रत्नाकर गुट्टेंना..!



💥शेतकऱ्यांच्या नावे हजारो कोटी रुपयांचे कर्ज उचलून गैरव्यवहार केल्याचा उमेदवार रत्नाकर गुट्टेंवर आरोप💥

परभणी/जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा मतदारसंघासाठी तुरुंगातून निवडणूक लढवण्याचा मान प्रथमच शेतकऱ्यांच्या नावे हजारों कोटी रुपयांचे कर्ज उचलल्याच्या प्रकरणातील आरोपी तथा उद्योजक रत्नाकर गुट्टे यांनी कारागृहातूनच आपल्या प्रतिनिधींच्या मार्फत उमेदवारी अर्ज भरला आहे. आज शुक्रवारी दि.०४ आक्टोंबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांच्या निवडणूक प्रतिनिधी व सुचक,अनुमोदक यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला आहे.

रत्नाकर गुट्टे यांनी 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्टीय समाजवादी पक्षाच्या वतीने गंगाखेड विधानसभेची निवडणूक लढवली होती.त्यावेळी त्यांना अगदी थोड्या फरकाने पराभव स्वीकाराव्या लागला होता.यावर्षी मात्र गुट्टे यांना कारागृहातूनच आपला उमेदवारी अर्ज दाखल करावा लागला आहे. यामुळे ते यंदा कारागृहातूनच निवडणूक लढवतील असे दिसत आहे.

💥रत्नाकर गुट्टे कारागृहात का आहेत ?

गंगाखेड शुगर लिमिटेडचे चेअरमन उद्योजक रत्नाकर गुट्टे यांच्यावर शेतकऱ्यांच्या नावे हजारो कोटी रुपयांचे कर्ज उचलून गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. ईडीच्या तक्रारीवरून त्यांच्यावर आरोप दाखल झाले असून, सध्या ते या प्रकरणात परभणीच्या जिल्हा कारागृहात आहेत.
गुट्टेंच्या प्रतिनिधींनी त्यांची अर्जावर कारागृहातून स्वाक्षरी आणलीय यानंतर तो अर्ज गंगाखेडच्या तहसीलदारांकडे जमा केला आहे. त्यांच्या वतीने राजेश काशिनाथ फड, संदीप फड, शेंडगे सय्यद सिराज, कृष्णा सोळंके, किशनराव भोसले, साहेबराव सुरनर आदी सूचक आणि अनुमोदकांनी त्यांचा अर्ज दाखल केला आहे.
जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकांच्या इतिहासात प्रथमच एखाद्या उमेदवाराने कारागृहातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामुळे गुट्टे यांच्या अर्जाची जिल्ह्यात जोरदार चर्चा होत आहे. मात्र आता येणाऱ्या काळात ते प्रचार यंत्रणा नेमकी कशी राबवतात ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे...


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या