💥वाशिम जिल्ह्यात कार्यकर्त्यांना पक्षनिष्ठा शिकवणार्‍या नेत्यांनी ठेवली पक्षनिष्ठा गहाण...?💥सत्ता आणी खुर्चीसाठी हपापलेल्यांनी केले दलबदल💥

प्रतिनिधी - फुलचंद भगत

वाशिम-आगामी विधानसभेची रणधूमाळी सूरू असुन अनेक दिग्गज नेते पक्षाच्या या फांदीवरून दुसर्‍या झाडांच्या फांदीवर ऊद्या मारत असल्याने या परिस्थित माञ मतदार राजा पुरता गोंधळून गेल्याने 'कोणता झेंडा घेवू हाती'?ही म्हणन्याची वेळ खुद्द मतदारावर आली आहे.कार्यकर्त्यांना पक्षनिष्ठा शिकवणार्‍या नेत्यांनीच आपली पक्षनिष्ठा गहाण ठेवत सत्तेच्या खुर्चीसाठी पक्षबदल केलेले वाशिम जिल्हात सध्या पाहावयास मिळत आहे.
         राजकारणात सर्वकाही क्षम्य असतं अशिच म्हण सत्यात ऊतरत असुन पक्षबदलाचे वारे बहूतांश पक्षामध्ये घोंगावत आले असुन कार्यकर्त्यांना पक्षनिष्ठा शिकवणार्‍या नेत्यांनाच पक्षनिष्ठेचे धडे गिरवन्याची वेळ आली असून सत्तेच्या खुर्चीसाठी पक्षबदल करुन तसेच स्वार्थी आणी धुर्तपणे राजकारन केल्या जात आहे.नेत्यांच्या मागे एकनिष्ठतेने आणी पक्षप्रेमापोटी लाळ घोटणार्‍या कार्यकर्त्यांची माञ पुरती पंचायत झाली असुन नेता जाईल त्या पक्षात झेंडा फडकवत मुकाट मेंढरासारखे चालन्यावाचुन गत्यंतर नसल्याचे चिञ सध्या वाशिम जिल्ह्यात निर्माण झाले आहे.तर दुसरीकडे जागृत झालेला मतदार माञ स्वार्थासाठी पक्षबदल करणार्‍या राजकारणी नेत्यांना जागा दाखवल्याबिगर राहणार नसल्याचीही सुज्ञ मतदारांमध्ये चर्चा आहे.वाशिम जिल्ह्यात तिनही मतदार संघामध्ये जातीपातीच्या नावावरून आणि मतदारांना पैशाची आणी विविध आमिषांची लालच दाखवुन पक्षांतर सूरु असुन सर्रास नेते पक्षांच्या फांद्यावरून दुसर्‍या पक्षांच्या फांद्यावर ऊड्या मारत असल्याने जिल्ह्याचे राजकारण जातीपातीच्या नावावर तसेच खिरापत वाटुन टिकिट पदरी पाडल्या जात असल्याचीही कुजबुज ऐकावयास मिळत असल्याने एकंदरीतच स्वार्थी वृत्तीने राजकारणाला ग्रासल्याचे चिञ आहे.माञ लोकशाहीमध्ये अमूल्य आणी सर्वात मोठा अधिकार असलेल्या मतदानाचा अधिकार वापरून सुज्ञ मतदार अशा पक्षनिष्ठतेला बाजुला सारून खुर्चीसाठी दुसर्‍या पक्षाचा झेंडा हाती घेतलेल्या ऊमेदवाराला घराचा रस्ता दाखवुन डिपाॅजित जप्त करन्याची वेळ आनल्यावाचुन राहणार नसून ऊच्चशिक्षित आणी सनमाणसांच्या प्रश्नांना आपलसं समजणार्‍या नेत्यांनाच आपलं अमूल्य मत देतील यात शंका नसुन सर्व मतदारांनी खुर्चीसाठी पक्षबदल करणार्‍या नेत्यांचा स्वार्थ वेळीच समजुन लोकशाही टिकवणे काळाची गरज बनले आहे..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या