💥शिवसेनेचे विशाल कदम आज ऐतिहासिक जनसागराच्या साक्षीने दाखल करणार उमेदवारी अर्ज..!💥शिवसेना-भाजप-रिपाइ-रासप महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसह उपस्थित राहणार प्रचंड जनसागर💥

परभणी/जिल्ह्यातील गंगाखेड-पालम-पुर्णा या तिन तालुक्यांचा समावेश असलेल्या गंगाखेड विधानसभा मतदार संघाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष केंद्रित झाले असून या मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस पक्षाचे विद्यमान आ.डॉ.मधुसूदन केंद्रे अपक्ष उमेदवार मा.आ.सिताराममामा घनदाट शिवसेनेतून बंडखोरी करुन अपक्ष निवडणूक लढवत असलेले संतोष मुरकूटे,वंचित बहुजन आघाडी कडून उमेदवारी दाखल केलेल्या एकमेव महिला उमेदवार सौ.कोटगीर व शिवसेना-भाजप-रासप-रिपाइ महायुतीचे अत्यंत तरुण तडफदार उमेदवार म्हणून पुर्णा नगर परिषदेचे मा.नगराध्यक्ष तथा विद्यमान उपनगराध्यक्ष व परभणीचे शिवसेना जिल्हा प्रमुख विशाल विजयकुमार कदम हे सुध्दा यावेळेस निवडणूक लढवत असून सदरील धनशक्ती विरुध्द जनशक्ती अशी होणार असल्याचे बोलले जात असून

जनसामान्यांशी अत्यंत तगडा संपर्क असलेले विशाल कदम हे आज शुक्रवार दि.०४ आक्टोंबर रोजी सकाळी १०-३० वाजेच्या सुमारास चिंतामणी मंदिर गोदाकाठ येथून जनता जनार्दनाच्या आर्शिर्वाद घेऊन पदयात्रा काढून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत यावेळी आमच्या प्रतिनिधीने त्यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की गंगाखेड-पालम-पुर्णा या तिनही तालुक्यातील माय-बाप मतदार तसेच संत-महात्म्यांच्या आशीर्वादाने मी आज आपला उमेदवारी अर्ज भरणार असून मतदारसंघाच्या खुंटलेल्या विकासाचे स्वप्न पूर्ण करणार आहे.

आपल्या माय-बाप जनतेच्या आशीर्वादाने महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून पक्षाने तुमची सेवा करण्याची संधी मला दिली असून मतदार संघाचा विकास करणे आणी तळागळातील गोर-गरीब,शेतकरी-शेतमजूरांना न्याय देणे हाच आपला मुळ उद्देश असल्याचे ही विशाल कदम म्हणाले मागील दहा वर्षांपासून या विधानसभा मतदार संघाच्या खुंटलेल्या विकासाचे स्वप्न पूर्ण करून, पुन्हा एकदा मतदारसंघाला नवंसंजीवनी देण्याकरिता. माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून, माझे हात बळकट करण्यासाठी आपण सर्वांनी आशीर्वाद देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असेही ते म्हणाले...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या