💥शहिदांना श्रद्धांजली व शहीद कुटुंब सन्मान कार्यक्रमाचे नारळी येथे आयोजन...! 💥कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उमरखेड कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अविनाश जाधव हे होते💥

राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक चार नागपूर
 एस आर पी एफ चा  पोलीस शिपाई दामू लखा आडे नारळी तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ हे दिनांक 20 एप्रिल 1993 रोजी मंगेझरी गाव जिल्हा गोंदिया येथील भूसुरुंग स्फोटात शहीद झाले होते
 येत्या 21 ऑक्टोंबर हा पोलीस स्मृतिदिन असल्याने त्यानिमित्त शहीद स्मृती स्मरण करून त्याचे पराक्रमाची माहिती लोकांपर्यंत पोचण्याची साठी शहीद कुटुंबाचा सन्मान करणे करीता सशस्त्र पोलीस उपनिरीक्षक श्री दीपक नामदेव तायडे धीरज कुमार रामदास नंदागवळी पोलीस नाईक शशांक बाबुराव शेवडे पोलीस शिपाई संजीव गोकुळ मेंढे सशस्त्र पोलीस हवालदार यांची उपस्थिती दिनांक 9 10 2019 रोजी नारळी या गावी श्रद्धांजली व शहीदकुटंब सन्मान कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते
 यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष अविनाश जाधव कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक उमरखेड मनोज जाधव ग्रामपंचायत सचिव राजुरे साहेब तंटामुक्ती अध्यक्ष व पोलीस पाटील व गावातील शेकडो नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा नारळी येथील विद्यार्थ्यांनी गावामध्ये प्रभात फेरी काढून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या