💥गंगाखेड मध्ये बदल घडवण्यासाठी धनदांडग्यांना दुर ठेवून शिवसेनेच्या विशाल कदम यांना साथ द्या - खा.संजय जाधव



💥कावलगाव ताडकळस येथे जाहीर सभेत शिवसेनेच्या अस्सल वाघाने फोडली डरकाळी💥

पूर्णा/जिल्ह्यातील शेतकरी,शेतमजुर ग्रामीण भागातील जनतेची शिवसेना भाजपा महायुतीशी नाळ जोडलेली आहे.त्यामुळे महायुतीकडून शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम यांना उमेदवारी दिली आहे.
या मतदारसंघात निव्वळ धनशक्तीच्या जोरावर अनेकांनी निवडणूका जिंकल्या आहेत.अश्या धनदांडग्यांना दुर ठेवून गंगाखेड मध्ये बदल घडवण्यासाठी महायुतीकडून शिवसेनेच्या विशाल कदम यांना साथ द्या सर्वांगीण विकास करण्याची ग्वाही मी देतो असे उद्गार जिल्ह्याचे खासदार संजय (बंडू) जाधव यांनी काढले. 
       गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार विशाल कदम यांच्या प्रचारार्थ काल बुधवारी १६ रोजी सायं कावलगांव व ताडकळस येथे खा.बंडू जाधव यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी ते बोलत होते.यावेळी महायुतीचे उमेदवार विशाल कदम, सभापती बालाजी देसाई, लिंबाजी भोसले,शंकरराव पिसाळ मुंदडा गुरुजी, लक्ष्मणराव बोबडे, दशरथ बोबडे, संतोष एकलारे, काशिनाथ काळबांडे, लक्ष्मीकांत कदम, नंदकुमार डाखोरे, बळीराम कदम, हिराजी भोसले, दिलीपराव अंभोरे, हभप.सोपानकाका बोबडे,मदनराव अंभोरे, मुंजाभाऊ कदम, माणीकराव हजारे, कोंडीबा सोनटक्के,विश्वनाथ सोळंके,बालाजी वैद्य,सुदामराव डोईफोडे, भगवानराव धस, विलासराव अवकाळे, आनंदराव सोनटक्के, रोहीदास पिसाळ, नितीन कदम,आदीं महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.पुढे बोलताना ते असे म्हणाले की,ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी असून यात जनशक्तीचाच विजय होईल. धनशक्तीच्या जोरदार अनेकांनी गंगाखेड चे आमदारपद भुषविले परंतू या मतदारसंघात विकासाची गंगा पोहोचवली नाही. महायुतीने एका सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातील विशाल कदम यांना उमेदवारी दिली आहे.तो मतदारसंघात विकास घडवून आणण्यासाठी सक्षम आहे.माझी त्याला खंबिर साथ आहे.त्यांना प्रचंड मतांनी विजयी करुन विधानसभेत पाठवावे असे आवाहन यावेळी जाधव यांनी केले.
गंगाखेड विधानसभा मतदारसंघात मागील काही वर्षात धनदांडग्यांची या मतदारसंघात मक्तेदारी केली.येथिल जनतेचे निकडीचे प्रश्न प्रलंबित ठेवले. यांची मक्तेदारी मोडून विकास घडवून आणण्यासाठी मी वचनबद्ध आहे. शिवसेना भाजप महायुतीकडून मी  निवडणुक लढवत आहे. आपल्या पुर्णा तालुक्यासह गंगाखेड व पालम तालुक्यातील जनतेने मला विजयी करुन मला विधानसभेत पाठवल्यास विकास काय असतो ते या धनदांडग्याना दाखवून देईल असे ही कदम म्हणाले.
-विशाल कदम महायुतीचे उमेदवार...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या