💥पुर्णा पोलीस पथकाने रेल्वे कम्युनिटी हॉल परिसरात पकडली ५७६० रुपयांची अवैध देशी दारु....!



💥शहरातून कम्युनिटी हॉलकडे ॲटोतून देशी भिंगरी संत्रा दारुच्या ९६ बॉटल घेऊन जातांना २ आरोपींना घेतले ताब्यात💥

पुर्णा/विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आचार संहिता लागलेली असतांना सर्वत्र कडक नाकेबंदी असतांनाही शहरासह ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात अवैध देशी विदेशी दारुच्या तस्करीसह मोठ्या प्रमाणात अवैध देशी-विदेशी दारुची विक्री होत असून या अवैध देशी-विदेशी दारु विक्रेत्यांना शहरातील परवाना धारक देशी-विदेशी दारु विक्रेते पुरवठा करीत असल्याचे पुन्हा एकदा आजच्या घटनेवरुन उघडकीस आले आहे.आज बुधवार दि.१६ आक्टोंबर रोजी सायं.०५-४५ वाजेच्या सुमारास पुर्णा पोलीस स्थानकाचे पो.नि.सुभाषराव राठौड यांच्या आदेशाने विधानसभा निवडणूक संदर्भाने पो.उप.नि.चंद्रकांत पवार पोहेकॉ.सय्यद मोईन,पोहेकॉ.नितीन वडकर,पोकॉ.सर्वस्वी समीर खान पठाण,विष्णू भिसे,लतीफ खान यांचे पथक शासकीय वाहनाने शहरात पेट्रोलींग करणे कामी निघाले असतांना पथकास विजय नगर येथे गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की ॲटो रिक्षा क्रमांक  एम.एच २६ ए.सी ४५०४ मध्ये एक इसम सुमेश मिलींद जोंधळे रा.आंबेडकर नगर पुर्णा हा प्रोव्हीबीशन गुन्ह्याचा माल देशी भिंगरी संत्रा दारु अवैध विक्री करीता जात आहेयावेळी पोलीस पथकाने दोन पंचांना सोबत घेऊन संबंधित आटोचा पाठलाग केला असता सदरील ॲटो रेल्वे कम्युनिटी हॉल समोर पथकास मिळुन आला यावेळी पथकाने ॲटो चालकाचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव राहूल माधवराव एंगडे रा.आंबेडकर नगर पुर्णा असे सांगितले याच ॲटोत मागील सिटवर एक मोठी पिशवी घेऊन बसलेल्या इसमास नाव विचारले असता त्याने त्याचे नाव सुमेश मिलींद जोंधळे रा.आंबेडकर नगर पुर्णा असे सांगितले यावेळी पथकाने पंचासमक्ष त्याचे ताब्यातील खताच्या पिशवीची तपासणी केली असता त्यात बॕच नं.१११४ ओसीटी - २०१९ असलेले १८० एमएल चे सिलबंद ९६ दारुचे बॉटल प्रत्येकी किंमत ६० रुपयें प्रमाणे एकून किंमत ५७६० रुपयांचा अवैध देशी दारू साठ्यासह अवैध दारू वाहतूकीस वापरण्यात आलेला बजाज रिअर ॲटो किंमत ६०,०००/- रुपयें जप्त करण्यात आला असून पो.उप.नि.पंढरी लक्ष्मण गंधकवाड यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन नमूद घटनेतील दोन्ही आरोपीं विरोधात कलम ६५ (ई) ८३ मपोका प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेतील जप्त मुद्देमालाचा बॕच नंबर तपासून अवैध दारु विक्री करणाऱ्यास अवैधरित्या देशी दारु पुरवठा करणाऱ्या परवाना धारक देशी-विदेशी दारु विक्रेत्यावरही गुन्हा दाखल करुन त्याचा परवाना रद्द करण्याची शिफारस पो.नि.सुभाषराव राठौड हे करण्याची शक्यता आहे..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या