💥गंगाखेड विधानसभेचे महायुतीचे उमेदवार विशाल कदम यांनी बजावला मतदानाचा हक्क..!💥उमेदवार विशाल कदम व त्यांच्या सौभाग्यवती सौ.रुपालीताई कदम यांनी इंदिरा गांधी शाळेतील मतदान केंद्रावर केले मतदान💥

परभणी/जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा मतदार संघातील शिवसेना-भाजप महायुतीचे तरुण तडफदार उमेदवार विशाल विजयकुमार कदम व त्यांच्या सौभाग्यवती सौ.रुपालीताई विशाल कदम यांनी विधानसभा निवडणूकीसाठी सकाळी ०७-०० वाजेच्या सुमारास शहरातील आनंद नगर परिसरातील इंदिरा गांधी विद्यालय येथील बुथ क्र.१७८ या मतदान केद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
जिल्ह्यातील ९७-गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप महायुतीचे अधीकृत उमेदवार विशाल विजयकुमार कदम यांना महायुतीकडून उमेदवारी बहाल करण्यात आली असून या मतदार संघाच्या निवडणूकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या