💥परभणीचे लोकप्रिय खा.संजयजी जाधव यांनी दिला गंगाखेड विधानसभा मतदार संघाला खरा न्याय...!💥पुर्णेकर खा.संजय जाधव यांचे ऋण मतपेटीतून फेडणार शिवसेना उमेदवार विशाल कदम यांना भरघोस मतांची देणार आघाडी💥


परभणी/ जिल्‍ह्यातील गंगाखेड विधानसभा मतदार संघाला इतिहासात पहिल्यांदाच अत्यंत तरुण तडफदार आणी सर्वसामान्य जनतेत मिसळणारा व प्रत्येकाच्या अडीअडचणीत तात्काळ धावून येणारा उमेदवार शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम यांच्या रुपाने लाभला असून त्यांना गंगाखेड विधानसभा मतदार संघाची उमेदवारी मिळवून देण्याचा सर्वस्वी मान जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार संजयजी जाधव यांनाच जातो शिवसेना पक्षप्रमुख श्री.उध्दवजी ठाकरे यांच्याकडे विशाल कदम यांच्या उमेदवारीसाठी सातत्याने पाठपुरावा करुन खा.जाधव यांच्या गंगाखेड विधानसभा मतदार संघ व विशेष करुन पुर्णा तालुक्याला दिलेल्या वचनांशी एकवचनी राहून पुर्ती केली व या मतदार संघातील शेतकरी पुत्राला विधानसभेची उमेदवारी बहाल करुन जनसामान्यांना न्याय दिला

अत्यंत स्पष्ट वक्ते आणी तापड स्वभावाच्या खा.संजय जाधव यांच्या विषयी तालुक्यात वेळोवेळी अत्यंत खालच्या पातळीला जाऊन अपप्रचार करणाऱ्या विरोधकांना त्यांनी एक प्रकारे सनसनीत चपराकच दिल्याचे सर्वत्र बोलले जात आहे.मागील अनेक दशकापासून कोणत्याही पक्षाने या परिसरातील भुमिपुत्राला उमेदवारी देऊन न्याय दिला नाही परंतु खा.संजय जाधव या शिवसेनेच्या लढवैया लोकप्रतिनिधीने लोकसभा निवडणूकीत या मतदार संघातील तमाम शिवसेनाप्रेमी मतदारांच्या मतांचे ऋण फेडण्याच्या निर्मळ भावनेने पुर्णा-पालम-गंगाखेड या तिन तालुक्यांचा समावेश असलेल्या मतदार संघातील भुमिपुत्र असलेल्या विशाल कदम या तरुणास उमेदवारी देऊन लाखों जनतेच्या हृदयात कायमस्वरुपी आदराचे स्थान निर्माण केले आहे.
गंगाखेड विधानसभा मतदारसंघात एकून १५ उमेदवार निवडणूक मैदानात असून या उमेदवारांमध्ये गंगाखेड मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार डॉ.मधुसूदन केंद्रे,अपक्ष मा.आ.सिताराम चिमाजी घनदाट,शिवसेनेचे तरुण तडफदार उमेदवार तथा पुर्णा नगर परिषदेचे मा.नगराध्यक्ष व विद्यमान शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल विजयकुमार कदम,मनसेचे विठ्ठल जवादे,बहुजन समाज पार्टीचे उमेदवार तथा पुर्णा नगर परिषदेचे मा.नगरसेवक देवराव खंदारे,वंचित बहुजन आघाडी उमेदवार तथा काँग्रेस पक्षाच्या विद्यमान जिल्हा परिषद सदस्य सौ.करुणा कुंडगीर,बहुजन विकास आघाडीचे उमेदवार गजानन गिरी,मागील सन २०१४ च्या निवडणूकीत अवघ्या १८०० मतांनी पराभूत झालेले राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार रत्नाकर गुट्टे,महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार सखाराम बोबडे तसेच शिवसेना पक्षातून बाहेर पडून अपक्ष निवडणूक लढवत असलेले संतोष मुरकुटे, अपक्ष अजहर मेहताब,अपक्ष गजानन मरगीर,अपक्ष तुकाराम व्हावळे,अपक्ष बालाजी सगर,अपक्ष संजीव प्रधान हे एकंदर १५ उमेदवार निवडणूक मैदानात उतरलेले असले तरीही यावेळी मात्र शिवसेना उमेदवार विशाल कदम यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांपूढे फार मोठे आव्हान निर्माण केले असून धनुर्धर अर्जूनरुपी शिवसेना उमेदवार विशाल कदम यांच्या रथाचा सारथी मात्र कृष्णरुपी खा.संजय जाधव असल्यामुळे विजय निश्चितच पांडवरुपी शिवसेना-भाजप महायुतीचा होणार असल्याचे मतदार संघातील जनसामान्यांमध्ये बोलले जात आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या