💥बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातल्या खातखेडात शेतकरी आत्महत्या...!💥मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दौऱ्या दरम्यान शेतकरी राजु तलवारेंनी केली गळफास घेऊन आत्महत्या💥 

बुलढाणा/जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील खातखेड गावात आज रविवार दि.१३ आक्टोंबर रोजी सकाळी ११-०० वाजेच्या सुमारास ३५ वर्षीय शेतकरी राजु ज्ञानदेव तलवारे नामक शेतकऱ्याने अंगात सत्ताधारी भारतीय जनता पार्टी प्रचार साहीत्यातील पुन्हा आणूया आपले सरकार असा उल्लेख असलेली भाजपची टी शर्ट घालून शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली दरम्यान आज विधानसभा प्रचार दौऱ्या निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बुलढाणा जिल्ह्यात असून त्यांच्या दौऱ्या दरम्यान शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने सत्ताधारी भाजप सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
राज्याचे कामगार मंत्री डॉ संजय कुटे यांच्या मतदार संघातच ही दुर्दैवी घटना घडली आहे
मयत शेतकऱ्याने कर्जबाजारी पणा मुळे आत्महत्या केल्याची चर्चा होत आहे..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या