💥गंगाखेड मतदार संघात धनदांडग्यांनी पैशाच्या जोरावर सत्ता मिळवून जनतेला मात्र उपेक्षीत ठेवले..!💥मासोळी धरणाची उंची वाढवण्यासाठी प्रयत्न करणार - विशाल कदम

गंगाखेड/गंगाखेड विधानसभा मतदार संघातील शिवसेना-भाजप महायुतीचे तरुण तडफदार उमेदवार विशाल कदम यांनी मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी देण्यास सुरुवात केली असून मतदार संघातील सर्वसामान्य जनतेतून त्यांना भरघोस पाठींबा मिळत आहे. गंगाखेड तालुक्यातील ईसाद,चाटोरी,राणीसावरगाव, बोरगाव आदीं भागातील शेतकऱ्यांना जलसिंचनासाठी मासोळी धरणाच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जावू लागला त्यातच वाढती लोकसंख्या लक्षात घेता पाणी पुरवठ्याचा प्रश्नही निर्माण होवू लागला. तालूक्यात अस्तीत्वात असलेल्या मासोळी धरणाची उंची वाढवल्यास पिण्याच्या पाण्यासह येथिल २५ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.ही  शेतकरी हिताची बाब लक्षात घेऊन मासोळी धरणाची उंची वाढवण्यासाठी प्रयत्न करणार यासाठी मी कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन विशाल कदम यांनी ईसाद येथे बोलताना केले.
        गंगाखेड मतदार संघात शिवसेना भाजप रिपाइं शिवसंग्राम रयतक्रांती सेना महायुतीचे अधीकृत उमेदवार विशाल कदम यांनी गंगाखेड तालुक्यातील ईसाद,चाटोरी,बोरगाव आदी गावात सोमवारी दि १४ रोजी विशाल कदम यांनी मतदारांशी काॅर्नर सभांच्या माध्यमातून संवाद साधला.यावेळी ते बोलत होते.पुढे बोलताना ते म्हणाले की, गंगाखेड विधानसभा मतदारसंघात मागील काही वर्षांपासून धनदांडग्यानी पैशाच्या जोरावर सत्ता मिळवली व स्थानिक जनतेला मात्र उपेक्षीत ठेवले या निवडणुकीत या धनदांडग्यांची मक्तेदारी मोडून काढा व शिवसेना भाजप महायुतीला विकास घडवून आणण्यासाठी विधानसभेत पाठवा असे ही कदम म्हणाले. यावेळी,भाजपचे विठ्ठलराव रबदडे, अॅड व्यंकटराव तांदळे, कृष्णा भोसले, जाणकीराम पवार, भुजंगराव सातपुते,बाबुराव पवार, अनिल सातपुते,  आदीं महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी घेण्यात आलेल्या कार्नरसभेला मोठी गर्दी झाली होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या