💥जिल्ह्यातील क्षेत्रिय अधिकारी विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून घोषीत...!💥जिल्हादंडाधिकारी पी.शिवशंकर यांनी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - 2019 ची प्रक्रिया सूरळीत पार पाडण्यासाठी केली घोषणा💥

परभणी दि.19:-  विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - 2019 च्या कामाकरीता जिल्हादंडाधिकारी यांनी निर्देशित केलेल्या क्षेत्रिय अधिकारी यांना दि . 19 ऑक्टोबर 2019 रोजी सायंकाळी 6  वाजेपासुन ते दि . 21 ऑक्टोबर 2019 पर्यंत शासनाचे अधिसूचनेव्दारे फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 21 नुसार विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून घोषीत केले आहे.
     जिल्हादंडाधिकारी पी . शिवशंकर यांनी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - 2019 ची प्रक्रिया सूरळीत पार पाडण्यासाठी , फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 ( सन 1974 चा अधिनियम 2 ) कलम 21 अन्वये  प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन परभणी जिल्हयातील जिंतुर - 95 , परभणी - 96 , गंगाखेड - 97 . पाथरी - 98 , विधानसभा मतदार संघात , विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - 2019 च्या कामासाठी , निवडणुक निर्णय अधिकारी परभणी , गंगाखेड , जिंतुर , पाथरी यांनी नियुक्त केलेल्या क्षेत्रिय अधिकारी यांना दि . 19 ऑक्टोबर 2019 रोजी सायंकाळी 6  वाजेपासुन ते दि . 21 ऑक्टोबर 2019 पर्यंत त्यांच्या कार्यक्षेत्रातील हददीकरिता विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून घोषित करण्यात येत असुन त्यांना फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 129 , 133 , 143 व 144 खाली शक्ती प्रदान करण्यात आली आहे. असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
                           -

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या