💥परभणी जिल्‍ह्यात आजपर्यंत टपाली मतपत्रीकांसाठी एकुण ५ हजार ७०७ अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केले अर्ज..!💥तालुक्यांतील तहसिल कार्यालयांतून टपाली मतपत्रीका प्राप्‍त करण्‍याबाबत आवाहन💥        परभणी, दि. 10 :-   टपाली मतदानपत्रीकेसाठी ज्‍या अधिकारी-कर्मचारी यांनी अर्ज केले आहेत. त्‍यांनी त्‍यांचे नाव ज्‍या विधानसभा मतदारसंघाच्‍या मतदार यादीत नोंदविलेले आहे. त्‍या  मतदारसंघाच्‍या तहसील मुख्‍यालयातून मतप‍त्रीका प्राप्‍त करुन घ्‍याव्‍यात. असे आवाहन निवडणूक विभागाने केले आहे.

      जिल्‍ह्यात आजपर्यंत टपाली मतपत्रीकांसाठी एकुण ५ हजार ७०७ अधिकारी-कर्मचारी यांनी अर्ज केलेले आहेत. ९५-जिंतूर, ९७-गंगाखेड, ९८-पाथरी या मतदारसंघात  नाव नोंदविलेल्‍या अधिकारी-कर्मचारी यांनी दि.११ व १२ ऑक्‍टोबर रोजी संबंधित तहसील मुख्‍यालयातून मतप‍त्रीका प्राप्‍त करुन घ्‍याव्‍यात. तसेच ९६-परभणी मतदारसंघात नाव असलेल्‍या अधिकारी-कर्मचारी यांनी दि.१२ ऑक्‍टोबर रोजी परभणी तहसील मुख्‍यालयातून मतपत्रीका प्राप्‍त करुन घ्‍याव्‍यात.

तसेच दि. १३ ऑक्‍टोबर रोजी होणा-या अधिकारी-कर्मचा-यांच्‍या निवडणूकीबाबतच्‍या  प्रशिक्षणाचेवेळी मतदानासाठी सुविधा कक्ष उपलब्‍ध करुन देण्‍यात आला  असल्‍याची निवडणूक विभागाने माहिती दिली आहे.

-*-*-*-*-

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या