💥गंगाखेड विधानसभा मतदार संघातील पुर्णा-पालम-गंगाखेड ३ तालुक्यात बेरोजगारीचा गंभीर प्रश्न..!💥स्वयंरोजगाराच्या नावावर अवैध व्यवसायांना प्रोत्साहन,अनेक तरुणांचे भविष्य उध्वस्त💥 

परभणी/जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा मतदार संघात पुर्णा-पालम-गंगाखेड अश्या एकंदर ३ तालुक्यांचा समावेश असून या विधानसभा मतदार संघातील निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींनी सातत्याने तिनही तालुक्यांच्या विकासाकडे दुर्लक्ष केल्याने या तालुक्यांतील औद्योगिक वसाहतींचा विकासापासून वंचित राहिल्याने रोजंदारीचा भयंकर प्रश्न निर्माण झाला असून या परिसरातील तरुणांच्या मानगूटीवर अक्षरशः बेरोजगारीचा भस्मासूर बसल्याने तरुण पिढीचे भविष्य उध्वस्त होतांना पाहावयास मिळत आहे.गंगाखेड विधानसभा मागील सन २००९ मध्ये झालेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीत या भागातील मतदारांनी अपक्ष उमेदवार म्हणून सिताराम चिमाजी घनदाट यांना निवडून देऊन आपला लोकप्रतिनिधी म्हणून विधानसभेत पाठवले परंतु त्यांच्या कारकिर्दीत मतदार संघात काही विकासकामे झाली खरी परंतु औद्योगिक क्षेत्र मात्र विकासापासून कोसो दुर राहिले औद्योगिक क्षेत्राचा यत्किंचितही विकास झाला नाही गंगाखेड विधानसभा मतदार संघात बेरोजगारी दुर व्हावी याकरिता उद्योगाला आतापर्यंत कोणत्याही लोकप्रतिनिधीने प्राधान्य दिले नाही त्यामुळे तरुण पिढीपुढे रोजगाराचा गंभीर प्रश्न निर्माण होऊन बेरोजदारीचा प्रश्न सोडविण्यासाठी तरुणांना नाईलाजाने अवैध धंद्यांकडे आपला मोर्चा वळवावा लागला व यातूनच तरुण पिढी नकळत गुन्हेगारी क्षेत्राकडे वळायला सुरुवात झाली तरुणांच्या याच मजबूरीचा नेमका फायदा राजकारण्यांनी घेतल्याचे निदर्शनास येते.यानंतर सन २०१४ यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणूकीत तत्कालीन आ.सिताराम घनदाट यांच्याकडून भ्रमनिराश झाल्याने गंगाखेड विधानसभा मतदार संघातील मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान आ.डॉ.मधुसूदन केंद्रे यांना निवडून दिले त्यांनीही किरकोळ विकासकामे वगळता या मतदार संघातील औद्योगिक क्षेत्राच्या विकासाकडे दुर्लक्षच केले त्यामुळे सर्वसामान्य जनतेचा भ्रमनिराश झाला याही पेक्षा गंभीर बाब म्हणजे मागील सतत ५ वर्षाझापासून दुष्काळाची झळ सोसणाऱ्या शेतकऱ्यांची विमा कंपण्यांनी फसवणूक केल्यानंतर ही विमा कंपण्यांविरोधात आ.केंद्रे यांनी कुठलीच ठोस भुमिका घेतली नाही तर आ.केंद्रे यांच्या विरोधात अवघ्या थोड्याश्या मतांच्या फरकाने पडलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी असंख्य शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर कर्ज उचलून उस उत्पादक शेतकऱ्यांची घोर फसवणूक केली.सर्वसामान्य मतदार जनतेचा संपूर्णतः भ्रमनिराश केलेले विद्यमान आ.डॉ.मधुसूदन केंद्रे,मा.आ.सिताराम घनदाट,शेतकऱ्यांची घोर फसवणूक करुन कोट्यावधींची अफरातफर केल्याचा आरोप असलेले डॉ.रत्नाकर गुट्टे या तिघांसह शिवसेना-भाजप महायुतीचे तरुण तडफदार उमेदवार शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम,वंचित बहुजन आघाडी कडून एकमेव महिला उमेदवार जिल्हा परिषद सदस्या  सौ.करुणाताई कुंडगीर या पाच प्रमुख उमेदवारांसह अन्य दहा उमेदवार यावेळी गंगाखेड विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवत असून मुख्य लढत महायुतीचे उमेदवार विशाल कदम रासपचे तुरुंगातून निवडणूक लढवत असलेले डॉ.रत्नाकर गुट्टे व अपक्ष उमेदवार तथा दोन वेळ आमदार राहिलेले मा.आ.सिताराम घनदाट यांच्यात तिरंगी लढत  होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.पुर्णा-पालम-गंगाखेड या तिन तालुक्यांचा समावेश असलेल्या गंगाखेड विधानसभा मतदार संघात सर्वसामान्य मतदारांनी निवडून दिलेल्या अकार्यक्षम लोकप्रतिनिधींनी अर्थात आमदारांनी मागील दिड दशकाच्या कालावधीमध्ये कुठलाच विकास तर केलाच नाही याशिवाय औद्योगिक क्षेत्राचाही विकास केला नाही किंवा या मतदार संघात एकाद्या उद्योगाची निर्मिती करण्याचा प्रयत्न करुन तरुणांच्या हाताला काम दिले नाही.या गंगाखेड विधानसभा मतदार संघातील आपली तरुण आज रोजगारासाठी हैद्राबाद-पुणे-मुंबई अश्या मोठमोठया शहराकडे वळत आहे या सर्व  गोष्टीना केवळ या मतदार संघात यापूर्वी आम्ही निवडून दिलेल्या निश्क्रिय लोकप्रतिनिधींची उदासीनता कारणीभूत असल्याचे मतदारांतून मत व्यक्त होतांना दिसत आहे.
त्यामुळे या तिनही तालुक्यातील बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी या बेरोजगार तरुणांसह सर्व बाहेर जाणाऱ्या कामगारांना येथेच रोजगार मिळवून देण्यासाठी तसेच रोजगार उपलब्ध होण्यासाठी या वेळेस सर्वसामान्य मतदार शिवसेना-भाजप महायुतीचे तरुण तडफदार उमेदवार तथा भुमिपुत्र विशाल विजयकुमार कदम यांना यावेळी मतदारांतून प्रचंड प्रतिसाद मिळत असून यावेळी या मतदार संघात चित्र बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या