💥उमेदवाराचा कोणत्याही प्रकारचा प्रचार समाजमाध्यमाद्वारे करू नका...!



💥जिल्हाधिकारी पी.शिवशंकर यांचे नागरिकांना आवाहन💥

परभणी दि.11 :-  विधानसभा निवडणूक २०१९ च्‍या निवडणुकीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी सर्वसामान्य नागरीक आपल्या (सोशल मीडिया) समाजमाध्यमाचा वापर करत आहेत. असे निवडणूक आयोगास निदर्शनास आले असून असा वापर करणे म्हणजे आदर्श आचारसाहिंतेचा भंग आहे. अशा पोस्ट करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल होऊ शकतो त्यामुळे सर्वसामान्य व्यक्तीने कोणत्याही उमेदवाराची पोस्ट प्रसिद्ध करू नये, अथवा शेअर करु नये असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी पी.शिवशंकर यांनी केले आहे.
       आयोगास असे निदर्शनास आले आहे कि, फेसबूक, व्हाट्सएप,
ट्विटर, इन्स्टाग्राम, युटूब इत्यादी समाजमाध्यमावरून विधानसभा निवडणूकीस उभ्या असलेल्या विविध राजकीय पक्षाच्या उमेदवारांचे चिन्ह, झेंडा, नाव, मतदान करण्याचे आवाहन तसेच निवडणुकीविषयी छायाचित्र व उमेदवाराच्या समर्थनार्थ इत्यादी स्वरूपाचा मजकूर प्रसिद्ध व प्रसारित करण्यात येत आहे. आदर्श निवडणूक आचारसाहिंतेनुसार उमेदवाराशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या पोस्ट करण्याविषयी जी अधिकृत समाजमाध्यमातील खाते आहेत. त्यांनाच प्रसिद्ध करण्याविषयी अधिकृतता आहे किवा जी माहिती प्रसिद्ध करावयाची आहे ती माहिती एम.सी.एम.सी. कडून प्रमाणित करून परवानगी घेणे आवश्यक आहे. आदर्श आचारसंहितेचे निवडणुकीच्या काळात पालन करण्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे आणि निःपक्षपाती निवडणुका पार पाडण्यासाठी सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी पी.शिवशंकर यांनी केले आहे.                         -*-*-*-*-

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या