💥जिल्ह्यात विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदान पुर्वी ४८ तासांसाठी मद्यविक्री बंदीचे आदेश...!


💥पुर्णा तालुक्यात जिल्हाधिकारी पि.शिवशंकर यांच्या आदेशाची अंमलबजावणी होणार काय ?💥 

परभणी/परभणी जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी पि.शिवशंकर यांनी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर दि.२१ आक्टोंबर २०१९ रोजी मतदान व दि.२४ आक्टोंबर २०१९ रोजी मतमोजणी असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून मतदानपुर्वी दि.१९ आक्टोंबर २०१९ रोजी सायंकाळी ०६-०० वाजेपासून ते दि.२४ आक्टोंबर २०१९ पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात ४८ तास वैध/अवैध मद्य विक्रीवर बंदी घातली असून जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उदभवून कुठेही अनुचित प्रकार घडू नये याकरिता मुंबई मद्य निषेध कायदा १९४९ चे कलम १४२(१) अन्वये जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन जिल्हाधिकारी पि.शिवशंकर यांनी जिल्ह्यातील अनुज्ञप्त्या सीएल-२,सीएल-३,एफएल-२,सीएलएफएलटिओडी-३,सीएल-३ बिअर विक्री,एफएल-३,एफएलबीआर-२ अर्थात परवाना धारक देशी-विदेशी वाईन शॉप चालक,बार ॲन्ड रेस्टॉरंट परमीट रुम चालक,बिअर शॉपी चालक,परवाना धारक देशी दारु विक्रेते, यांना दि.१० आक्टोंबर २०१९ रोजी लेखी स्वरुपात सक्तीचे आदेश काढून या काळात अवैधरित्या मद्य विक्री करतांना आढळल्यास कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.
परभणीचे जिल्हाधिकारी पि.शिवशंकर यांच्या आदेशाची जिल्ह्यात काटेकोरपणे अंमलबजावणी होईल काय ? असा प्रश्न उपस्थित होत असून जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा मतदार संघात समावेश असलेल्या पुर्णा-पालम-गंगाखेड या तिन तालुक्यांपैकी पुर्णा तालुका हा अतिसंवेदनशिल तालुका असून या तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध देशी-विदेशी दारुचा कारभार स्थानिक परवाना धारक मद्य विक्रेत्यांच्या पाठबळातून चालत असल्याचे निदर्शनास येऊनही या परवाना धारक मद्य विक्रेत्याकडे जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागातील भ्रष्ट अधिकारी आर्थिक हितसंबंध जोपासून कारवाई करण्यास टाळत असल्यामुळे पुर्णा शहरातील मुख्य बाजार पेठेतील टिळकरोड परिसरातील एकमेव परवाना धारक वाईन शॉप असलेल्या में जयस्वाल वाईन शॉप तसेच पुर्णा-ताडकळस रोडवरील शासकीय ग्रामीण रुग्नालया लगत असलेल्या में वसंत कंट्री लिकर शॉप या परवाना धारकाकडून तसेच बि.ए.जयस्वाल या किरकोळ देशी दारु दुकानदाराकडून शहरी व ग्रामीण भागातील अवैध दारु विक्रेत्यांसह खानावळीच्या नावावर धाबे चालवणाऱ्या धाबा चालकांना मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी दारुचा पुरवठा केला जात आहे परंतु अवैध दारु विक्री संदर्भात दाखल गुन्ह्यांमध्ये जप्त होणाऱ्या दारु साठ्याचा बॕच नंबर तपासून संबंधित दारु साठा कोणत्या अधिकृत परवानाधारक मद्य विक्रेत्याकडील आहे याचा तपास करणे सोईस्कररित्या टाळले जात असल्यामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या देशी-विदेशी दारु तस्करीसह अवैध दारु विक्रीला प्रोत्साहन मिळत आहे.सद्या विधानसभा निवडणूकीची सर्वत्र रणधुमाळी चालत असल्याने राजकीय पक्षांची गमछे गळ्यात घालून मद्यपी शहरासह ग्रामीण भागातही शिमगा करत अक्षरशः अर्वाच्च शिविगाळ करीत हैदोस घालतांना पाहावयास मिळत असून त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण झाला आहे..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या