💥शेवटी वडीलांच्या देहाला अग्नीच देण्याचा मुलांचा अधिकार ना ?💥वास्तव - सत्यता - लेखक - चौधरी दिनेश

एक वयोवृध्द आजोबा अत्यंत दुःखी अवस्थेत रेल्वे स्थानक परिसरात एकटेच चिंताग्रस्त अवस्थेत बसलेले आढळून आले..
सहज विचारले बाबा असे एकटेच का बसलात..?
माझ्या प्रश्नाने आजोबांचे मन गहिवरले डोळ्यात अश्रुंची धार..
म्हणाले काय करु बेटा दोन मुल दोघांनी माझ्याकडील सर्वकाही संपत्ती हिसकावून मला घरातून हाकलून दिले..
बाबा का दुःखी होतात शेवटी सर्वकाही त्यांचेच तर आहे ना..
आजोबा म्हणाले बेटा आता मी जगायचे कशे ? त्यांच्या प्रश्नाने मी ही काही वेळ स्तब्ध झालो,पुन्हा समजूत काढण्याच्या उद्देशाने म्हणालो
बाबा जाऊ द्या आता राहिलेच किती दिवस तुमचे ? रामकृष्ण हरी..रामकृष्ण हरी..म्हणत दिवस काढायचे आणी शेवटी कलयुग आहे.मुलांच कामच आहे वडिलांच्या देहाला अग्नी देण्याचे,काही मुल मृत्यूनंतर तर काही मुल मृत्यूपुर्वीच जिवंतपणीच आपल्या दुष्कृत्याने अग्नी देतात.मृत्यूनंतर अग्नी दिल्यास संपूर्ण देह जळतो तर मृत्यू पुर्व दिल्यास त्या जन्मदात्याच्या काळजात अक्षरशः आग लागते आणी त्याचे काळीज जळण्यास सुरुवात होते अहो शेवटी वडीलांच्या देहाला डाग अग्नी देण्याचा मुलांचाच अधिकार ना ? तो अधिकार ते यशस्वी रित्या बजावतातच ना ?
बाबांच्या डोळ्यातील अश्रूंचा बांध फुटला आणी शेवटी रामकृष्ण हरी..रामकृष्ण हरी..म्हणत त्यांनी अखेरचा श्वास घेतला....

लेखक - चौधरी दिनेश (रणजीत सी.)
मो.०९७६६५२९०५५/०९१४६६८७७७७

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या