💥पुर्णेत दुचाकी वाहण चोरीच्या घटनेत वाढ,अज्ञात चोरट्यांनी रेल्वे स्थानका समोरुन पळवली दुचाकी...!


💥घटने संदर्भात पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल💥

पूर्णा/शहरासह तालुक्यात दुचाकी वाहून चोरीच्या घटनांमध्ये वाढ होतांना दिसत असून रेल्वे स्थानक परिसर बसस्थानक परिसर मुख्य बाजारपेठ आदी परिसरांमध्ये वाहन धारकांना अवघड झाले असून पाहता पाहता उभी केलेली दुचाकी वाहन केव्हा गायब होतील सांगत येत नाही.
असाच प्रकार येथील रेल्वे स्थानका समोर घडला असून दुचाकी स्वाराने आपली बजाज कंपनीची पल्सर दुचाकी रेल्वे स्थानका समोर उभी केली असता अद्यात चोरट्याने काही क्षणातच दुचाकी पळवल्याची घटना घडली या संदर्भात पूर्णा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
          घटने संदर्भात अधिक माहीती अशी की महागाव येथील फिर्यादी विष्णुकांत इरबा भालेराव यांनी पूर्णा रेल्वे स्थानका समोर आपली दुचाकी जिचा क्रमांक एम एच २२ ए इ ६५९२ किंमत ५०,००० हजार रुपये असलेली पल्सर गाडी सोडून प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर चौकशी करून येइपर्यंत अज्ञात चोरट्याने चोरून नेली म्हणून आज सोमवार दि.१४ आक्टोंबर रोजी त्यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटने संदर्भात अधिक तपास पो.कॉ.नितिन वडकर हे करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या