💥शिवसेना-भाजप महायुतीचे तरुण तडफदार उमेदवार विशाल कदम यांची विशेष मुलाखत...!💥शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांना कोण किंमत देणार त्यांच्या पापाची फळे हे त्यांनाच फेडावी लागणार💥

 गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील तरुण उमेदवार म्हणून उदयास आलेले शिवसेनेचे विशाल कदम हे पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढत आहे पूर्णा नगरपालिकेत सलग तीन वेळा नगरसेवक , नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष पदाचा असलेला अनुभव हा त्यांना या निवडणुकीत कामी येत आहे . स्थानिक संस्थेमार्फत केलेल्या विकासकामांमुळे त्यांच्यावर पूर्णा तालुक्यात नागरिकांचा विश्वास आहे मात्र विधानसभेचे निवडणुकी मोठे असून आपण केलेल्या विकास कामाचा या निवडणुकीत आपल्याला नक्कीच फायदा होईल तर वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी  उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या प्रेरणेने आता मतदारसंघातील नागरिकांचे सेवा मिळण्याची संधी द्यावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली
त्यांच्याशी संवाद साधताना त्यांनी प्रचाराच्या धामधुमीतही अजित न्युजशी मनमोकळ्या प्रतिक्रिया दिल्या

*तुम्ही पहिल्यांदाच विधानसभेचे निवडणूक लढवत आहात मतदारांशी भेट घेताना काय अनुभव आले?*

 विधानसभेच्या निवडणुकीत पहिल्यांदाच लढतोय नगरपालिका सदस्य जिल्हाप्रमुख तसेच नगराध्यक्ष पदापर्यंत मी पोहोचलो होतो शिवसेनेने माझ्यासारखा कार्यकर्त्याला विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दिली हे ती माझ्या  विकास कामाची पावती आहे निवडणूक प्रचारात मला सर्व मतदारसंघातून उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे नागरिक आपल्या भावना व्यक्त करीत आहेत त्यांच्या सूचना तसेच विकासकामांना प्रत्यक्ष उतरण्याची संधी मिळाल्यास त्यांच्या अडचणी दूर  करण्याचा प्रयत्न करीत

*महायुती असताना सोबतचा एक घटक या मतदारसंघात तुमच्या विरोधात लढतो,याबाबत तुमचे मत*

महायुतीमध्ये गंगाखेड विधानसभेची जागा ही अधिकृतपणे शिवसेनेच्या वाट्याला आली होती असे असताना महायुतीचा एका घटक पक्षाने  या  मतदारसंघात उमेदवारी दाखल केली आहे शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांना कोण किंमत देणार त्यांच्या पापाची फळे हे त्यांनाच फेडावी लागणार आहेत मतदार त्यांना त्यांची जागा दाखवून देतील आम्ही त्यांच्याशी मैत्रीपूर्ण लढतीसाठी पूर्णपणे समर्थ आहोत...

*शिवसेनेने तरुणांना संधी दिली एक तरुण म्हणून या निवडणुकीकडे तुम्ही कसे पाहता*

शिवसेनेत काम करताना निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून मी काम केले या कामाचे फलित म्हणून मला शिवसेना जिल्हाप्रमुख व त्यानंतर गंगाखेड सारख्या विधानसभा क्षेत्रात उमेदवारी दिली शिवसेनेने नेहमी तरुणांना संधी देण्याचे काम केले आहे तरुणांमध्ये जनतेसाठी काहीतरी काम करण्याची जिद्य असते  त्यादृष्टीने मला मिळालेली संधी चे मी पूर्णशक्तीनिशी सोने करेन शिवसेनेने टाकलेला विश्वास साध्य करून तरुणा सोबतच ज्येष्ठ मार्गदर्शन मार्गदर्शन दर्शनाचे दर्शकांची निवडणूक फायदेशीर ठरणार आहे.

* गंगाखेड मतदारसंघाचा राज्यात एक वेगळा लौकिक आहे मातब्बर व प्रस्थापितांशी तुमची लढत आहे याकडे कसे पाहता *

होय गेल्या अनेक वर्षांपासून गंगाखेड मतदार संघ वेगवेगळ्या चर्चेत आला आहे निवडणुकीच्या काळात या मतदारसंघात वेगवेगळी आमिषे मतदारांना दाखवत  असल्याचा अपप्रचार केला जात आहे. पावसाळ्यात उगवणाऱ्या छत्रीप्रमाणे अचानक प्रकट होऊन मतदानाशी बनवाबनवि करण्याचा प्रयत्न सातत्याने होतो या निवडणुकीत अशा उमेदवारांना मतदार नक्कीच उघडून टाकतील. नागरिकांना नवीन नेतृत्व हवे आहे प्रस्थापितांच्या लक्ष्मी अस्त्राचा  फंडा आता या निवडणुकीत फोल ठरणार आहे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशा लढाईचे चित्र निवडणुकीच्या निकालातून दिसून येईल राज्यात महायुतीच पुन्हा सत्तेत येणार आहे ते जनतेने ठरवले आहे त्यामुळे बाकी सर्व बाबी या निरर्थक चर्चेचा विषय आहेत.

*मतदारसंघाच्या विकास कामाबाबत तुमचे विजन काय?*

 मतदारसंघातल्या गंगाखेड, पालम, पूर्णा या तिन्ही तालुक्यात शेती सिंचन यासह मूलभूत कामे करण्याची गरज आहे मतदारसंघात असलेला पाणीपुरवठ्याच्या भीषण प्रश्न, व्यापार-उद्योग, शेतमजुरी, शेतकरी तसेच रोजगारीचा प्रश्‍न बिकट आहे. राज्यात शिवसेनाप्रमुख उद्धवजी ठाकरे हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी  व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या समवेत सोबत राहुन सातत्याने जनविकास उपायोजना राबवण्याचा प्रयत्न करीत आहेत आगामी काळात राज्याची धुरा ही परत युती सरकारकडे जाणार असल्याने जिल्ह्याचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांच्या मार्गदर्शना खाली आपण समस्या व उपायोजना तसेच समाजकारणाला प्राधान्य देणार आहोत  20 टक्के राजकारण व 80 टक्के समाजकारण हे शिवसेनेचे हे धोरण आहेत

*एक उमेदवार म्हणून मतदारांना आवाहन...*

सर्वसामान्य कार्यकर्त्याला मिळालेली  जिल्हा प्रमुख पदाची  जबाबदारी निष्ठापूर्वक पार पाडत आहे  मर्यादित कार्यक्षेत्रात विकास कामे मार्गी लावण्याचा मी प्रयत्न करेन.विधानसभा निवडणुकीत मी प्रथमच सामोरा जात आहे शेती आरोग्य उद्योग सिंचन पाणी वीज दळणवळण निवारा अशा प्राथमिक व मूलभूत सोयीसुविधांच्या क्षेत्रात वेगवेगळे प्रश्न सोडवण्याची गरज आहे थोर पुरुषांची समता आणि बंधुता, विचार प्रेरणा हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, लोकनेते स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे तसेच युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सेवा कार्याची स्वप्न पूर्ण पूर्णत्वास नेण्याचा मी वसा घेतला आहे  उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही याची निसंदिग्ध ग्वाही व  वचन देत जनसेवा करणार. सबका साथ सबका विकास सबका विश्वास हा मूलमंत्र समोर ठेवून जनतेच्या अडीअडचणी सोडवण्याचा सातत्याने प्रयत्न करेल. कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता शिवसेनेच्या पाठीशी  मतदारांनी  खंबीरपणे उभे राहावे हीच एक अपेक्षा......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या