💥निवडणूक आयोग व पोफाळी पोलीस स्टेशनने पळशी फाटा येथे नाकाबंदीत पकडले ६० लाख रुपयें...!


💥वाशिम ते उमरखेड ला जाणारी गाडी क्र. एम.एच. २९.ए.आर.०९२२ बोमुओ या गाडीत आढळली रक्कम💥 

मुळावा प्रतिनिधी:-सध्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता 21 सप्टेंबर पासून सुरू झाली असून निवडणुकीदरम्यान अवैध दारू व पैसा थांबावा याकरिता प्रशासन कामाला लागले असून ठिक ठिकाणी नाकाबंदी करण्यात आलेली आहे . आजा दि.१७/१०\२००१९ रोजी संध्याकाळी ५.३० ते ६.०० च्या दरम्यान  वाशिम ते उमरखेड ला जाणारी गाडी क्र. एम.एच. २९.ए.आर.०९२२ बोमुओ या गाडीमध्ये पळशी फाटा येथे तपासा दरम्यान या गाडीत ६० लाख रु. एवढे घबाड मिळाले यावेळी तपासधिकारी म्हणुन मडळ अधिकारी  मुन साहेब,तलाठी व्यवाहारे साहेब,तसेच पोफाळी पोलीस ठाणेदार कैलास भगत, लखन जाधव पोलीस (६८१)देविदासलाडगे सुहास खंदारे इत्यादी कर्मचारी  यावेळस हजर होते..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या