💥परभणी जिल्ह्यात मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर मोबाईल जवळ बाळगण्यास होणार कठोर कारवाई...!

  💥जिल्हाधिकारी पि.शिवशंकर यांनी केले आदेश जारी💥


परभणी, दि . १८:-   दिनांक २१ ऑक्टोबर २०१९ रोजी मतदानाच्या दिवशी  मतदान केंद्रावर मतदारास मोबाईल जवळ बाळगण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे, त्यामुळे मतदारांनी मतदानासाठी  जाताना  मोबाईल जवळ बाळगु नये असे आवाहन जिल्हाधिकारी पी . शिवशंकर यांनी केले आहे.

       निवडणूक आयोगाच्या निदर्शनास असे आले आहे की, मतदान केंद्रावर जाताना मतदार मोबाईल जवळ घेऊन मतदान केंद्रात प्रवेश करतात व  मतदान केंद्रावर सेल्फी काढतात , मतदान केल्याचे फोटो काढतात, व ते सोशल मिडीयावर प्रसारित करतात. यामुळे मतदान गोपनियतेचा भंग होतो. व हा गंभीर गुन्हा आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर जाताना मतदार मोबाईल किंवा इतर ईलेक्‍ट्रॉनिक डिवाईस सोबत बाळगत नसल्‍याची खात्री केली जाणार आहे. मागील  लोकसभा निवडणूकीच्या वेळेस असे प्रकार मतदान केंद्रावर घडुन आले होते त्यावेळी संबधितावर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. यावेळी मतदारांनी मतदान केंद्रावर मोबाईल सोबत घेऊन जाऊ नये. असे आवाहन पी. शिवशंकर यांनी केले आहे.

-

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या