💥राज्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाल्या शिवाय कद्दापी स्वस्थ बसणार नाही - उध्दव ठाकरे
💥शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार विशाल कदम यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत श्री.ठाकरेंनी दिले आश्वासन💥

परभणी/राज्यातील शेतकऱ्याची सरसकट संपूर्ण  कर्जमाफी झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे प्रतिपादन शिवसेना पक्ष प्रमूख ऊद्धव ठाकरे यांनी आज दि.13 रोजी पालम येथे महायुतीचे उमेदवार विशाल विजयकुमार यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत बोलताना व्यक्त केले.
 गंगाखेड विधानसभा मतदार संघातील शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार विशाल कदम यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेला संबोधित करतांना श्री.उध्दव ठाकरे बोलत होते.यावेळी व्यासपीठावर परभणी लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय खा. संजय जाधव,माजी आ.हरीभाऊ लहाने,मा.जिल्हा प्रमुख सुधाकर खराटे गणेशराव रोकडे, अभय चाटे, उपजिल्हा प्रमुख दशरथ भोसले,युवासेना उपजिल्हा प्रमुख माणिकराव सुर्यवंशी,पालम तालुका प्रमूख हनूमंत पौळ,पुर्णा तालुका प्रमुख काशिनाथ काळबांडे,उपनगराध्यक्ष बालासाहेब रोकडे,शहर प्रमुख गजानन पवार,पुर्णा शहर प्रमुख संकेत उर्फ मुंजाभाऊ कदम,मा.शहरप्रमुख नितीन उर्फ बंटी कदम,युवा शहर प्रमुख विकास वैजवाडे,उपशहर प्रमुख विद्यानंद तेजबंद,नगरसेवक ॲड.राजेश भालेराव,नगरसेवक शामराव कदम,डॉ.सुभाष कदम उपतालुका प्रमुख श्रीकांत कराळे,आदिंची उपस्थीती होती.
   श्री. ठाकरे पुढे बोलतांना म्हणाले की, शेतकऱ्यांची कर्जमाफी ही मला पसंत नसून,सरसकट संपूर्ण कर्जमुक्ती झाल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही. यापुढे पिक विम्यासाठीही शिवसेना रस्त्यावर उतरणार असून, गोर-गरीब जनतेला दहा रुपयात जेवनाची थाळी मिळेल. एक रुपयात आरोग्य तपासण्या करण्याची सोय करण्यात येईल. मी शेतकरी नसलो तरी,शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रु मला समजतात. त्यामूळे शेतकर्यांसाठी यापुढेही शिवसेना काम करील अशी ग्वाही.त्यांनी ऊपस्थित मतदारांना दिली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पदुदेवा जोशी यांनी केले. यावेळी शीवाजी खंडागळे गजानन सिरस्कर , पाडुरंग रोकडे,शेख मुकरम,तुकाराम पाटिल , लिंबाजीराव टोले व कार्यक्रमासाठी तालुक्यातील शिवसेना पदाधिकार्यांनी पुढाकार घेतला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या