💥गंगाखेड विधानसभा मतदार संघात स्वयंघोषीत भुरट्या मतदार प्रतिनिधींचा मतविक्रीचा अनोखा धंदा..?💥आपआपल्या परिसरातील मतदारांच्या याद्या बनवून उमेदवारांकडून मतदारांच्या नावे पैसे वसूली ?

💥वास्तव-सत्यता - चौधरी दिनेश (रणजीत सी.)

परभणी/जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा मतदार संघ हा मागील दिड दशका पासून सातत्याने धनदांग्यांचा मतदार संघ म्हणून नावारुपाला आला असून सदरील मतदार संघातील मतदार निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीं कडून विकासाची कुठलीच अपेक्षा न ठेवता केवळ भावनात्मक होऊन मागील दोन दशकापासून अकार्यक्षम व कर्तृत्वशुन्य उमेदवारांना मतदान करीत असल्यामुळे गंगाखेड विधानसभा मतदार संघातील तब्बल तिन तालुके ज्यात पुर्णा-पालम-गंगाखेड या तिन तालुक्यांचा समावेश आहे.हे तिनही तालुके विकासापासून वंचित राहिल्याचे पाहावयास मिळत असून याही विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीत या भागातील मतदारांनी अत्यंत विचारपूर्वक कुठल्याही आर्थिक अमिषाला बळी न पडता किंवा भावनिक न होता मतदान केले तर निश्चितच या तिनही तालुक्यांच्या विकासाला चालना मिळेस असे मत राजकीय तज्ञांकडून व्यक्त होत आहे.
राज्य विधानसभेच्या निवडणूकीसाठी दि.२१ आक्टोंबर २०१९ रोजी मतदान होणार असून गंगाखेड विधानसभा मतदार संघातून काही उमेदवार स्वतःच्या कर्तृत्वावर तर काही उमेदवार साम-दाम-दंड-भेदाच्या बळावर निवडणूक मैदानात उतरले आहेत.प्रत्येक विधानसभा निवडणूकी प्रमाणे ही सुध्दा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मागील वर्षभरा पासून काही धनदांडग्या उमेदवारांनी मोर्चे बांधनीस सुरुवात केल्याचे पाहावयास मिळत असून ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये कुठे धार्मिक स्थळांची डागडूगी तर कुठे नवीन धार्मिक स्थळांच्या बांधकामांना तर कुठे रस्ते दुरुस्ती छोट्यामोठ्या पुलांच्या बांधकामांना सुरुवात झाल्याचे पाहावयास मिळत आहे.सर्वसामान्य जनतेच्या धार्मिक भावनांना खतपाणी घालून आपल्या राजकीय कारकीर्दीच्या वटवृक्षाचा घेरा कसा वाढवायचा याचा सखोल अभ्यास असलेल्या राजकारण्यांनी याही वेळी या अद्भुत प्रयोगाला प्राथमिकता दिल्याचे दिसून येत आहे.
गंगाखेड विधानसभेची निवडणूक कुठल्याही परिस्थितीत जिंकायची आणी 'खुलजा सिमसीम' म्हणून राज्याच्या विधानसभेत घुसायचेच असा दृढ निश्चय केलेल्या काही धनदांडग्या उमेदवारांनी आता मतदार खरेदीच्या अघोरी प्रयोगाला ही सुरवात केल्याचे गंगाखेड विधानसभा मतदार संघातील पुर्णा-पालम-गंगाखेड या तिनही तालुक्याच्या शहरी भागांसह ग्रामीण भागातही पाहावयास मिळत असून अनेकांनी तर अक्षरशः मतदार खरेदीसाठी एजंट अर्थात दलालांचीच नेमनूक केल्याचे पाहावयास मिळत असून एजंटांमार्फत परिसरातील मतदारांच्या याद्या मागवून त्या याद्यांप्रमाणे मतदारांचा परस्पर मतदार खरेदी-विक्रीचा गोरखधंदा आरंभ झाल्याने बोलले जात आहे.मतदार खरेदी-विक्रीच्या यादीत आपले तर नाव नसेल ना ? असा गंभीर प्रश्न सुजान मतदांमध्ये उपस्थित होऊन मतदारांच्या मनात संभ्रमावस्था निर्माण होत आहे.

💥सोयाबीन पिककापणी वेळीच विधानसभा निवडणूक लागल्याने शेतकऱ्यांना सोयाबीन कापणीसाठी मजूर मिळणा..! 


गंगाखेड विधानसभा मतदार संघातील पुर्णा-पालम-गंगाखेड या तिन तालुक्यातील अनेक गावखेड्यांमध्ये शेतकऱ्यांना अक्षरशः सोयाबीन पिकाच्या कापणीसाठी मजूर मिळत नसून अनेक शेतमजूर आपला शेतमजूरीचा पारंपारिक व्यवसाय सोडून विधानसभा निवडूकीच्या कामांमध्ये गुंतल्याने तर काही धनदांडग्या उमेदवारांकडून काही मिळेल या आशेने भरकटत असल्यामुळे शेतकऱ्यांचे कापणीला आलेले सोयाबीन पिक शेतमजूरां अभावी अक्षरशः जसेच्या तसे शेतात पडून असल्याचे पाहावयास मिळत असून मागील पाच वर्षापासून दुष्काळाच्या भयंकर वेदना सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना यावेळी देवादेवा करुन दैवाने साथ दिली असली तरीही ऐन सोयाबीन कापणीच्या वेळी विधानसभा निवडणूक लागल्यामुळे 'दैवाने दिले अन् राजकीय धनदांडग्या भुताने पळवळे'असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.शेतकऱ्यांना पुर्वी सोयाबीन पिकाच्या कापणी साठी शेतमजूरांना प्रतीबॕग १६०० रुपयें मजूरी द्यावी लागत होती परंतु ऐन सोयाबीन पिक कापणीवेळी विधानसभा निवडणूक लागल्यामुळे शेतमजुरांचे दरही वाढले असून शेतकऱ्यांना सोयाबीन पिक कापणीसाठी प्रतीबॕग २०००/- ते २५००/-रुपयें मजुरी देऊनही मजुर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना अक्षरशः अश्रू ढाळण्याची वेळ आली आहे.
याही पेक्षा गंभीर गोष्ट म्हणजे विधानसभा निवडणूकीत उभ्या असलेल्या धनदांडग्या उमेदवारांनी मतांच्या दरात कमालीची वाढ केल्याचे उमेदवारांनी नेमलेल्या एजंट अर्थात तथाकथित कार्यकर्त्यांतून बोलले जात आहे.त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष असलेल्या या गंगाखेड विधानसभा मतदार संघाचे चित्र शेवट पर्यंत स्पष्ट होणार नसल्याने या वेळेस या मतदार संघातील सुजान मतदार विकासाभिमूक कर्तृत्ववान लोकप्रतिनिधी निवडून देण्याला प्राधान्य देतील की पुन्हा एकदा आपला लोकप्रतिनिधी म्हणून एखाद्या धनदांडग्याला राज्याच्या विधानसभेत पाठवतील याचा उलगडा तर निवडणूक निकाला नंतरच लागेल.परंतु सद्या मात्र मतदानाची २१ आक्टोंबर २०१९ ही तारीख अवघ्या सहा दिवसांवर येवून ठेपल्याने जिल्ह्यातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना व पोलीस प्रशासनाला डोळ्यात तेल घालून सतर्क राहावे लागणार आहे....

[टिप - लेख बातमी किंवा कुठल्याही साहित्याची कॉफी करण्याचा प्रयत्न करु नए]

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या