💥उमरखेड तालुक्यातील पोफाळी येथे दिव्यांगानी काढली 'मतदार जनजागृती रॅली'...!💥स्व.वसंतराव नाईक अंध,मुक-बधिर व अपंग शिक्षण संस्थेच्या वतीने रॅलीचे आयोजन💥

उमरखेड (प्रतिनिधी):-लोकशाहीला बळकट करण्यासाठी आपला मतदानाचा हक्क बजावणेt आवश्यक आहे, ह्या संदर्भात 'दिव्यांग मतदार जनजागृती  रॅली' चे आयोजन स्व.वसंतराव नाईक अंध,मुक-बधिर व अपंग शिक्षण संस्था वसंतनगर पोफाळीच्या  वतीने करण्यात आले होते,सदर रॅली ही शाळेच्या पंटागणातुन पोफाळी वसंतनगर येथील मेन रस्ताने  मार्गक्रमण करत मतदार जनजागृती चे नारे देत रॅलीचा पुन्हा शाळेत समारोप झाला.
     ह्या प्रसंगी  पोफाळी पोलीस स्टेशन ठाणेदार कैलास भगत,पोफाळी चे सरपंच आनंदराव बरडे,पोलीस पाटील बाळासाहेब खंदारे  मुख्याध्यापक एन.बी.राठोड, पी.जे. जामकर यांच्या प्रमुख उपस्थीत होते त्यावेळी दिव्यांग मतदारना मतदाना संबंधीत कुठलीही अडचण आल्यास शाळेशी संपर्क साधावा असे आव्हान शाळेच्या मुख्याध्यापाकाने केले व कार्यक्रमाचे प्रास्ताविक पी.डी.कुर्‍हाडे,यांनी केले तर आभार प्रदर्शन अशोक हनवते यांनी केले  शिक्षकवृद व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच शाळकरी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या