💥शिवसेना पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे यांचे परभणीत आगमन खा.संजय जाधव यांनी केले स्वागत....!💥पालम येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या सभेसाठी उसळला भगवा जनसागर ..!

💥महायुतीचे उमेदवार विशाल कदम यांच्या प्रचारार्थ अवघ्या काही वेळात होणार उध्दव ठाकरेंच्या सभेला सुरुवात💥


गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप रिपाइं शिवसंग्राम रयतक्रांती सेना महायुतीचे अधिकृत तरुण तडफदार उमेदवार विशालभाऊ विजयकुमार कदम यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या जाहीर सभेचे आयोजन आज रविवार दि.१३ रोजी करण्यात आले असून या सभेला गंगाखेड रोडवरील नारलेवार मैदानावर जाहीर सभेला अवघ्या काही वेळात सुरुवात होणार आहे.

या सभेसाठी शिवसेना-भाजप-रिपाई सह महायुतीतील कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यासह प्रचंड जन समुदाय उपस्थित झाला असून अवघी गंगाखेड नगरी भगवीमय झाली असून सर्वत्र भगवे वादळ निर्माण झाले आहे.
परभणीत अवघ्या काही क्षणापुर्वीच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे आगमन झाले असून जिल्ह्याचे अस्सल सिंघम शिवसेनेना खासदार संजय जाधव शिवसेनेचे आमदार डॉ.राहुल पाटील विधानसभा प्रमुख माणिक पोंढे यांनी उद्धव ठाकरे यांचे स्वागत केले आहे परभणी कडून काही वेळानंतर ते गंगाखेड विधानसभा क्षेत्रातील पालम येथे सभेसाठी जाणार असल्याचे समजते....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या