💥दुर्गा,बाल गणेश महोत्सवा निमित्त मुख्यकार्यकारी अधिकारी अंगणवाडीत...!💥नांदेड जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांची पळसा येथील अंगणवाडीला भेट💥

💥प्रतिनिधी - सविता हराळ

पळसा/निवड करून त्या ठिकाणी महिलांच्या आरोग्यवाढीसाठी सहभोजनाचा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या निरिक्षणासाठी नांदेड जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी पळसा येथील अंगणवाडीला भेट दिली. तसेच ल्याहारी येथील प्राथमीक शाळेला भेट देवून मार्गदर्शन केले.
या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांच्या सोबत शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, गटविकास अधिकारी,के.एल. गड्डापोड, बालविकास प्रकल्प अधिकारी विवेक देशमुख, हे ऊपस्थित होते.
३६४ अंगणवाडी पैकी ४५ अंगणवाडींची प्रायोगीक तत्वावर निवड करण्यात आली असून या ठिकाणी गरोदर महिलांचे व गर्भातील बाळाचे योग्य पोषण होवून सशक्त व निरोगी बालक जन्माला यावे या ऊद्देशाने सहभोजनाचा ऊपक्रम राबवण्यात येत आहे. जागतीक आरोग्य संघटनेच्या निर्देशानुसार या ऊपक्रमाचे न्योजन करण्यात आले असल्याचे मु.का.अ. अशोक काकडे यांनी सांगीतले.
दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी काकडे यांनी ल्याहरी येथील जिल्हा परिषद प्राथमीक शाळेला भेट देवून विद्यार्थ्यांची शैक्षणीक गुणवत्ता तपासणी केली. विद्यार्थी व विद्यार्थीनींना विवीध शैक्षणीक साहित्याच्या माध्यमातून सोपे व व्यवहार्य शिक्षण देण्यासाठी मार्गदर्शन केले. त्यांनी स्वत: विद्यार्थ्यांचा वर्ग घेवून भुमीती, मराठी व्याकरण ईत्यादी विषयाचे धडे दिले . यावेळी त्यांच्या सोबत गटशिक्षणाधीकारी रुस्तूम ससाने, विस्तार अधिकारी (शिक्षण) पि. वाय.जाधव  मुख्याद्यापिका ए. एन. संगेवार, विस्तार अधिकारी प्रदिप सोनटक्के ईत्यादी ऊपस्थित होते...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या