💥मध्य प्रदेशात बस नदीत कोसळून 6 जणांना जलसमाधी, 19 जखमी...!

💥बस इंदोरहून छतरपूरला जात होती. या बसमध्ये जवळपास 45 प्रवासी होते💥

मध्य प्रदेशातील रायसेनमध्ये एक बस पुलावरून नदीत कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला असून 19 जण जखमी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे बस पुलाचा कठडा तोडून रीछन नदीत कोसळली. ही बस इंदोरहून छतरपूरला जात होती. या बसमध्ये जवळपास 45 प्रवासी होते. या घटनेची माहिती मिळताच येथील स्थानिकांच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन सुरु करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या