💥परभणी जिल्‍हयात आज 50 उमेदवारांनी केले नामनिर्देशन पत्र दाखल...!




💥विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्‍ह्यात एकुण ८८ उमेदवार रिंगणात💥


परभणी, दि. 4 :-  महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी जिल्‍हयात आज अखेरपर्यंत एकूण88 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. मतदार संघ निहाय आकडेवारी पुढील प्रमाणे 95-जिंतूर -09, 96-परभणी - 16, 97-गंगाखेड – 13 आणि 98-पाथरी –12. विधानसभा मतदारसंघात आज अखेर एकूण 410 नामनिर्देशनपत्रांचे वितरण करण्यात आले आहे. यामध्ये 95-जिंतूर - 65, 96-परभणी -138, 97-गंगाखेड - 143आणि 98 – पाथरी - 64 असे आज अखेरपर्यंत एकूण 410नामनिर्देशनपत्राचे वितरण करण्यात आले आहे. आजअखेर पर्यंत परभणी जिल्‍ह्यात एकूण 88 उमेदवारांनी यामध्‍ये ९५- जिंतूर-१९ उमेदवारांनी २७ नामनिर्देशनपत्र, ९६-परभणी २८ उमेदवारांनी ३७ नामनिर्देशनपत्र, ९७-गंगाखेड मध्‍ये २६ उमेदवारांनी ४२ नामनिर्देशनत्रे तसेच ९८-पाथरी १५ उमेदवारांनी १९ नामनिर्देशनपत्र दाखल केले असल्याची  माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली आहे.

-*-*-*-*-

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019

निवडणूक निरीक्षकांनी साधला पत्रकारांशी संवाद



      परभणी, दि. 4 :-  विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -२०१९ सुरळीतरित्‍या पार पाडावी यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून ९५-जिंतूर व ९६- प रभणी विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षक म्‍हणून भुपिंदर सिंग यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे. त्‍याचप्रमाणे ९७-गंगाखेड व ९८-पाथरी विधानसभा मतदारसंघासाठी निरीक्षक म्‍हणून विजय केतन उपाध्‍याय यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे. आज त्‍यांनी पत्र्कारांशी प्रत्‍यक्ष संवाद साधून निवडणूक विषयी काही तक्रारीसाठी सावली विश्रामगृह येथे सायंकाळी ४ ते ५ या वेळेत संपर्क साधावा. अशी माहिती दिली. श्री.सिंग हे सावली विश्रामगृहात  वर्षा कक्षात थांबले असून त्‍यांचा मोबाईल नं. ७४४८२२८२१२ व ई मेल आयडी obgen9596@gmail.com असा आहे.

      श्री.उपाध्‍याय हे वसंत कक्षात थांबले असून त्‍यांचा मोबाईल क्र. ९६२३९१९९५९ व ई-मेल आयडीobgen97ggk98pathri@gmail.com असा आहे. अशी माहिती त्‍यांनी पत्रकारांना यावेळी दिली.

-*-*-*-*-

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या