💥विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 मतदान केंद्र परिसरात कलम 144 लागू...!


💥परभणीचे जिल्हादंडाधिकारी पी.शिवशंकर यांनी केले आदेश जारी💥


परभणी, दि.17:-  जिल्ह्यातील विधानसभा निवडणूकीची संपुर्ण प्रक्रीया शांततेत , निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून आणि कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी ज्या ठिकाणी मतदान होणार आहे , त्या ठिकाणी फौजदारी प्रक्रीया संहीता 1973 चे कलम 144 लागू करणे आवश्यक आहे . मतदान केंद्राच्या ठिकाणापासून 200 मिटर परिसराच्या आतील सर्व पक्ष कार्यालय / उमेदवारांचे मंडपे , सर्व दुकाने , सर्व प्रकारचे फेरीवाले मोबाईल , कॉर्डलेस फोन , पेजर , वायरलेस सेट , ध्वनीक्षेपके व ईतर ईलेक्ट्रॉनिक उपकरणे , निवडणूकीच्या कामाव्यतिरीक्त खाजगी वाहन , संबंधीत पक्षाचे / अमेदवाराचे चिन्हाचे प्रदर्शन व निवडणूक कामाव्यतिरीक्त व्यक्तीस प्रवेश करण्यास प्रतिबंध करणे आवश्यक आहे.

त्यामुळे परभणीचे जिल्हादंडाधिकारी पी . शिवशंकर  यांनी  फौजदारी प्रक्रीया संहीता 1973 चे कलम 144 अन्वये  प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन  विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 ची प्रक्रिया परभणी जिल्ह्यात ज्या ठिकाणी मतदान केंद्रावर मतदान होणार आहे . त्या ठिकाणी 200 मिटर परिसराच्या आतील सर्व पक्ष कार्यालय / उमेदवारांचे मंडपे . सर्व टकाने . मोबाईल , कॉडलेस फोन , पेजर , वायरलेस सेट , ध्वनीक्षेपके , सर्व प्रकारचे फेरीवाले व ईतर ईलेक्ट्रॉनिक उपकरणे , निवडणुकीच्या कामाव्यतिरीक्त खाजगी वाहन , संबंधीत पक्षाचे उमेदवाराचे चिन्हाचे प्रदर्शन व निवडणूक कामाव्यतिरीक्त व्यक्तीस प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे . हा आदेश निवडणूकीचे कामे हाताळतांना आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होउ नये म्हणुन दिनांक . 19 ऑक्टोबर , 2019 रोजीचे सायंकाळी 6 वाजेपासून ते दिनांक . 21 ऑक्टोबर , 2019 रोजी मतदानाची संपूर्ण प्रक्रिया होईपर्यंत अंमलात राहील . तसेच प्रत्येक ईसमावर हे आदेश तामील करणे शक्य नसल्यामुळे हे एकतर्फी आदेश ध्वनीक्षेपकावर पोलीसांनी जाहीर करुन त्यास प्रसिध्दी द्यावी असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या