💥पुर्णेतील संभाजी चौकात बांधण्यात येणाऱ्या नुतन व्यापारी संकुलास छ.संभाजी महाराजांचे नाव द्या..!


💥नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे युवा सेनेचे विद्यानंद तेजबंद यांनी केली मागणी💥

पुर्णा/शहराला जोडण्यात येणाऱ्या बसस्थानक मार्गावरील छत्रपती संभाजी महाराज चौक परिसरात पुर्वी असलेल्या चमनच्या जागेवर पुर्णा नगर परिषद प्रशासना मार्फत व्यापारी संकुलाच्या बांधकामास सुरुवात करण्यात आली असून सदरील नुतन व्यापारी संकुलास छ.संभाजी महाराज व्यापारी संकुल असे नाव देण्यात यावे तसेच छत्रपती संभाजी महाराज यांच्या नियोजित पुतळा परिसरातील बेकायदा करण्यात आलेले अतिक्रमण तात्काळ हटवून छत्रपती संभाजी महाराज पुतळा परिसराचे तात्काळ सुशोभिकरण करण्यात यावे अशी मागणी आज शुक्रवार दि.२० सप्टेंबर रोजी युवा सेनेचे सरचिटणीस विद्यानंद तेजबंद यांनी एका निवेदनाद्वारे नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे केली असून मुख्याधिकाऱ्यांकडे केली असून पुढे निवेदनात असे नमुद केले आहे की नगर परिषद प्रशासनाने तात्काळ या दिशेने योग्य ती पावले उचलली नाही तर युवा सेना तिव्र आदोलन छेडेल असा ही इशारा निवेदनात देण्यात आला आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या